Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५
१५ लाखांचा मुद्देमाल जप्त — मोटारसायकल चोरी करणारे दोघे अटकेत
अमळनेर तरूण गर्जना रिपोट-
अमळनेर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करून परिसरात मोटारसायकली चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २४ मोटारसायकली आणि रु. १५ लाख ६३ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अमळनेर परिसरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी (स.), मा. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (स.), तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायकराव कोते (स.) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम (स.), पो.स्टे. अमळनेर यांनी केले.
तांत्रिक तपासातून चोरटे हेरले
गुन्हे शोध पथकाने शहरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले. संशयितांचा मागोवा घेत धडगाव (जि. नंदुरबार) परिसरातील डोंगर-दऱ्यातून दोन इसम —
हिमंत रेहज्या पावरा आणि अंबालाल भुरट्या खरडे, दोघे रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार — यांना अटक करण्यात आली.
*२४ मोटारसायकलींसह लाखोचा माल हाती*
अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी अमळनेर तसेच इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले. त्यांनी चोरी केलेल्या गाड्या सातपिंप्री येथील जंगल परिसरात लपविल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून २४ मोटारसायकली जप्त केल्या.
या वाहनांमध्ये होंडा युनिकॉर्न, शाईन, बजाज पल्सर, टीव्हीएस रायडर, हीरो स्प्लेंडर इत्यादी कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. त्यांची एकूण किंमत रु. १५,६३,०००/- इतकी आहे.
*गुन्हा नोंद व पुढील तपास*
सदर आरोपींवर अमळनेर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३०८/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. काशिनाथ पाटील व सागर साळुंखे हे करीत आहेत.
*कारवाईत सहभागी पथक*
या यशस्वी कारवाईत पोउपनि शरद काकळीज, पोकॉ. प्रशांत पाटील, गणेश पाटील, उज्वलकुमार म्हसके,नितीन मनोरे,उज्वल पाटील,हितेश बेहरे यांनी विशेष परिश्रम घेतले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा