Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
आमदार अनिल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्तेपदी नियुक्ती...
आमदार अनिल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्तेपदी नियुक्ती...
अमळनेर तरूण गर्जना :- -महाराष्ट्र राज्याचे माजी मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री, नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली आहे.
सदर नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनिल पाटील यांच्या या नियुक्तीमुळे पक्षाला एक अनुभवी, संयमी, शांत स्वभावाचे आणि विकासाभिमुख नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे आणि लोकांशी असलेल्या निकट संबंधांमुळे पक्षाच्या संघटनात्मक बळकटीला नवी दिशा व ऊर्जा मिळणार असल्याचा विश्वास पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.
आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत आमदार पाटील यांनी ग्रामीण भागातील विकास, शेती, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि रोजगार निर्मिती यावर भर दिला आहे. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी आदिवासी भागाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या.
मंत्रीपदाच्या काळात त्यांनी आपत्तीग्रस्तांना मदत, पुनर्वसन आणि जनहिताच्या धोरणात्मक निर्णयांमधून कार्यक्षम प्रशासनाचे उदाहरण घालून दिले. त्यांच्या प्रामाणिक, लोकाभिमुख कार्यपद्धतीची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना ही राज्यस्तरीय जबाबदारी दिली आहे.या नियुक्तीबद्दल अमळनेरसह जळगाव,धुळे आणि नंदुरबार जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून सामाजिक माध्यमांवर शुभेच्छांचा ओघ सुरू आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी ही नियुक्ती अमळनेरचा आणि उत्तर महाराष्ट्राचा सन्मान असल्याचे म्हटले आहे.
(कोट)
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन प्रवक्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात प्रवक्ता म्हणून मला जबाबदारी दिल्याबद्दल सर्वप्रथम मनःपूर्वक आभार मानतो.
प्रवक्ता म्हणून पक्षाच्या धोरणांचा प्रसार, जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडणे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामांन्यांपर्यंत पोहोचविण्यास मी सदैव कटिबद्ध आहे. माझ्यासोबत प्रवक्ता म्हणून निवड झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा..!
अनिल भाईदास पाटील
प्रवक्ता- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश
मा.मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य
आमदार- अमळनेर विधानसभा मतदारसंघ
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा