Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १२ नोव्हेंबर, २०२५

१५ हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक व उपशिक्षक रंगेहात अटक – शिक्षण क्षेत्रात धक्कादायक भ्रष्टाचाराचा पर्दाफाश!!



शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना एका मुख्याध्यापक आणि उपशिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीकडे शासकीय फाईल मंजुरीसाठी दोन्ही शिक्षकांनी पैशांची मागणी केली होती. फिर्यादीने तत्काळ ACB कडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ACB पथकाने योजनाबद्ध सापळा रचून आरोपींना १५ हजारांची लाच स्वीकारताना प्रत्यक्ष पकडले.

या कारवाईदरम्यान लाच रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनता शिक्षण प्रसारक संस्था,बेटावद ता शिंदखेडा, जि. धुळे) संचलित महात्मा गांधी विद्यालय, मांजरोद (ता. शिरपूर) येथील मुख्याध्यापक कैलास सखाराम पाटील (वय ५६) आणि उपशिक्षक गोपाळ रघुनाथ पाटील (वय ४७) यांना ₹१५,००० लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
या घटनेमुळे तालुक्यातील शिक्षक समाजात आणि शैक्षणिक क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.
“शिक्षक हा समाजाचा पाया असतो, पण अशा कृत्यांनी शिक्षण संस्थांची प्रतिष्ठाच धोक्यात आली आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक शिक्षणप्रेमी व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लाचखोरीच्या या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण शिरपूर तालुक्यात चर्चेचा विषय रंगला असून, भ्रष्टाचारावर कठोर अंकुश लावण्याची मागणी जनतेकडून जोर धरत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध