Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

व्यवसाय कर्ज मिळत नसल्याने चिमठाणे बँक ऑफ इंडिया वर तरुणांचा ऐल्गार ....



चिमठाणे परिसर -प्रतिनिधी प्रविण भोई -
सरकार तरुणांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून तरुणांना विविध योजनेच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती व्हावी म्हणून बँकांना तरुणांना रोजगार निर्मितीसाठी बँकांना  कर्ज उपलब्ध करून देण्याचे  विविध घोषणाची सरबत्ती करते.मात्र जेव्हा तरुण त्या बँकेत कर्ज घेण्यासाठी जातो . तेव्हा त्याला आत्मनिर्भर भारताचा अर्थ कळतो. त्याला विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. विविध प्रकारच्या कागदांची पूर्तता करण्याचे त्याच्यापुढे आव्हान असते ते पूर्ण करून देखील तरुणांना कर्ज मिळत नसेल. तर मग आत्मनिर्भर भारताची निर्मिती कशी होईल. तरुणांना कोणत्या प्रकारे  आत्मनिर्भर होता येईल.सरकार म्हणते उद्योजक व्हा बँक असताना लोन देत नसतील तर तरुण उद्योजक कसे बनतील.. तसाच प्रकार चिमठाणे गावातील बँक ऑफ इंडिया मध्ये बघायला मिळाला.चिमठाणे एकंदरीत छोटे-मोठे व्यवसाय तरुण यांनी चिमठाणे परिसरात व्यवसाय उभारला आहे. 

मात्र तो वाढवण्यासाठी बँक आपल्याला कर्ज देईल या आशेने उद्योग निर्मिती केली होती  मात्र चिमठाणे बँक ऑफ इंडिया मात्र त्यांना कर्ज द्यायला तयार नाही. चिमठाणे बँक ऑफ इंडिया मध्ये तरुणांनी सर्व प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करून देखील त्यांना व्यवसाय कर्जापासून वंचित राहायची वेळ आली आहे. त्यांना विविध कारणे दाखवून व्यवसाय कर्ज नाकारण्यात आले. त्यामुळे चिमठाणे परिसरातील तरुणांनी बँक ऑफ इंडिया मध्ये एल्गार पुकारला. व बँक मॅनेजर यांना घेराव करून कर्ज नाकारण्याची विचारणा केली. 

त्यावेळेस बँक मॅनेजर यांची उत्तरे देताना दमछाक झाली. काही तरुणांनी त्या बँकेत कर्ज घेतले होते. व नियमित परत फेड देखील केली होती. मात्र तरी देखील  त्या तरुणांना  वाढीव कर्ज देण्यात आले नाही. उपस्थित असलेल्या  तरुणांनी चिमठाणे बँक ऑफ इंडिया मधील  बँक मॅनेजर यांची बदली करण्याची मागणी केली आहे.त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता सोनू फौजी, बाळा मराठे, सागर वाडीले, नितीन वाडीले, भैय्या मराठे, ईश्वर वाडीले, कमलेश माळी,योगेश गिरासे, गणेश माळी, अविनाश वाडीले,सिद्धार्थ मिस्तरी,प्रदीप सोनवणे इ. चिमठाणे परिसरातील तरुण उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध