Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५
नगरसेवक पदाचे प्रभाक क्रं १३ ब चे इच्छुक उमेदवार सुनिल महाजन
अमळनेर प्रतिनीधी
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय तापमान वाढले असताना नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून सुनिल महाजन यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. सर्वसामान्य कुटुंबातून स्वबळावर पुढे आलेल्या आणि शहरातील दैनंदिन समस्यांची प्रत्यक्ष जाण असलेल्या सुनिल महाजन यांना नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून क्रं १३ ब भागात सुनिल महाजन यांच्या इ उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चेला उधाण आले आहे.
मात्र प्रभाग क्रं १३ ब मध्ये नगरसेवक साठी इच्छुक उच्च शिक्षित असलेले सुनील महाजन यांनी अगदी सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवीत आपला नामांकन अर्ज साध्या पद्धतीने भरला.
शहराच्या सर्वांगीण विकासाचे ठोस व्हिजन, नागरिकांच्या छोटे-छोटे प्रश्न सोडवण्यासाठी तत्परता, तसेच कोणत्याही वैमनस्यापलीकडे जाऊन काम करण्याची त्यांची ओळख अनेक मतदारांना भावली आहे. "शहराचा सामान्य माणूस कोणत्या अडचणींना रोज सामोरे जातो, याची प्रत्यक्ष जाण सुनिलभाऊ यांना आहे," असे अनेक नागरिक सांगताना दिसतात.
नागरिकांसह युवा मतदारांचा ही मिळतोय प्रतिसाद
प्रभाग क्रं १३ ब भागातूनही त्यांच्या नावाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. युवा मतदारांमध्येही त्यांच्या नावाबाबत उत्सुकता असून, "प्रभाग बदलायचं असेल तर स्थानिक आणि काम करणारा नेता हवा," अशी भावना व्यक्त होते आहे. आपल्या प्रभागात विकासकार्यात पारदर्शकता, जवाबदारी आणि नागरिकांशी संवादावर आधारित प्रशासन देण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे सुनिल भाऊ समर्थकांचे म्हणणे आहे. ह्या निवडणुकीत सुनिल महाजन यांना मिळणारा प्रतिसाद पाहून आजच त्यांचा विजय नक्की असल्याचे समर्थकाकडून सांगण्यात येत
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा