Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

आमलीबारी स्कूलबस दुर्घटना-संस्थाचालकावर 'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा ! निष्काळजी व्यवस्थेमुळे विद्यार्थी जीव धोक्यात



नंदुरबार प्रतिनिधी : असमलीबारी, ता. आक्कलकुवा येथील घाटरस्त्यावर स्कूलबस दरीत कोसळून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर 52 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी स्कूलबस पाठविणारया मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील शैक्षणिक संस्थाचालक, सचिव, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आदी चार जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. 13 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आक्कलकुवा पोलिस ठाण्यात हा गुन्हा

दाखल करण्यात आला. गुरूवारी रात्री तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्पाधिकारी अरविंद गणपत वळवी यांनी आक्कलकुवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जय तुळजाभवानी बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ, चाळीसमंव या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र रामदास चौधरी, सचिव विजय रामदास चौधरी, संस्थेच्या अनुदानित आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक वैभव ईश्वरलाल चौधरी, मुकेश सखाराम चौधरी (सर्व राहणार चाळीसगांव) आणि एनएच 15 एके 1459 या स्कूलबसचा मालक अशा पाच जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यातील व तालुक्यातील शालेय वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, इतर शैक्षणिक संस्थांच्या बसांची देखील मोठ्या प्रमाणावर चौकशी होण्याची शक्यता आहे. दोर्षीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, विद्याथ्यर्थ्यांच्या सुरक्षेला कसलीही तडजोड मान्य नाही, अशी स्पष्ट मागणी पालक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध