Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
जातीच्या दाखल्यासाठी 3 लाखांची लाच; UMU सिनेट सदस्य नितीन ठाकूर ACBच्या जाळ्यात....
जातीच्या दाखल्यासाठी 3 लाखांची लाच; UMU सिनेट सदस्य नितीन ठाकूर ACBच्या जाळ्यात....
धुळे प्रतिनिधी : अनुसूचित जमातीचा जात पडताळणी दाखला काढून देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि शिक्षक नितीन लीलाधर ठाकूर यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. ACBने ठाकूर यांना ताब्यात घेतले असून या कारवाईमुळे धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नितीन ठाकूर हे धुळे शहरातील न्यू सिटी हायस्कूलमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांचे मासिक वेतन सुमारे एक लाख रुपये आहे. असे असतानाही त्यांनी जात प्रमाणपत्रासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदार तरुणीने तीन वर्षांपूर्वी अनुसूचित जमातीचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र बराच कालावधी उलटूनही दाखला न मिळाल्याने तिच्या मालेगाव येथील भावाने संबंधित कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी एका लिपिकाने शिक्षक नितीन ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर ठाकूर यांनी तीन लाख रुपये दिल्यास काम होईल, अशी मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने ACBकडे तक्रार दाखल केली होती. पडताळणीनंतर तब्बल पाच महिन्यांनी नितीन ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे नितीन ठाकूर हे एका मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता होती. मात्र या कारवाईमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर प्रतिनिधी :- दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन चोपडा तालुक्यातील घुमावल येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना 12 रोजी दुपारी 12 वाज...
-
तरुणी बेपत्ता शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा संशय अमळनेर तालुक्यातील कळंबु येथे शेतात कामासाठी गेलेली १५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा