Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

अजून बरेच बोगस बॅक डेट प्रस्ताव जळगाव शिक्षण विभागाला प्राप्त ? गुन्हे दाखल करण्याची मागणी



जळगाव प्रतिनिधी -जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडे अजून डझनभर बॅक डेट शिक्षक भरतीचे प्रस्ताव मागील काळात प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे त्या बोगस बॅक डेट शिक्षकांना देखील मान्यता मिळणारच होती परंतु त्या अगोदर अमळनेर,एरंडोल, पारोळा तालुक्यातील शिक्षण संस्थेतील बोगस शिक्षक भरती उजेडात येऊन त्त्यांच्या वर बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस फरकबील लाट ल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्या प्रकरणात माजी शिक्षण उपसंचालक, वेतन अधीक्षक, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी याच्या सह मोठ मोठ्या संस्था चालकांना अटक झाली आहे. आणि काही फरार आहेत.आता जे बॅक डेट शिक्षक भरतीचे प्रस्ताव जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातून प्राप्त झाले आहेत त्त्यांचे देखील शालार्थ आयडी बनवून देण्यासाठी त्याना पहिले दुसरे अप्रूव्हल मिळवून मान्यता आदेश मिळवण्यासाठी जिल्ह्यातील याच दलालांनी मदत केल्याची आणि त्या सर्व शिक्षक संस्था चालक मुख्याध्यापक सचिव आणि संचालक यांच्या कडून लाखो रुपये ऍडव्हान्स देखील घेऊन ठेवल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरु झाली आहे. म्हणजे यापूर्वी ज्या ज्या शाळेवर गुन्हे दाखल करून त्याना अटक करण्यात आली होती *त्याच पद्धतीचा गुन्हा करण्यासाठी हे लोकं पण रांगेत होते.जर अगोदरच्या शाळांची बोगस बॅक डेट शिक्षक भरती उजेडात आली नसती तर या पण शाळेत नक्कीच बोगस बॅक डेट शिक्षक भरती झालीच असती आणि त्यानी पण वेतन अधीक्षक कार्यालयातून बोगस फरकबील लाटून शासनाची फसवणूक केलीच असती
विशेष म्हणजे जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षण खात्याच्या टेबलावर अजून जे बोगस बॅक डेट शिक्षक भरतीचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे ते विशेष करून एरंडोल, पारोळा, भडगाव, पाचोरा, धरणगाव, 40 गाव तालुक्यातील बड्या आणि लहान लहान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव, संचालक आणि मुख्याध्यापक यांनीच तयार करून सर्व बनावट कागदपत्रे एजन्ट मार्फत तयार करून बोगस ठराव जोडून त्या सर्व शिक्षकांकडून नोकरी लावून देण्याच्या बदल्यात पैसे स्विकारून आणि शिक्षण खात्यातील काही भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकारी यांना टाक्केवारी वाटप करून बोगस आवक जावक क्रमांक टाकून त्या प्रस्तावावर सह्या देखील केल्या गेल्या आहेत अशी माहिती मिळत आहे. 

विशेष म्हणजे ते प्रस्ताव पवित्र पोर्टल डावलून आणि टी ई टी परीक्षा नापास असलेले काही शिक्षक भरती बंदी काळातील तारीख टाकून पाठवले गेले आहेत.आता नाशिक एस आय टी ने जळगाव जिल्ह्या माध्यमिक शिक्षण विभागात अचानक धाड टाकून त्या सर्व फाईल आपल्या ताब्यात घेऊन त्या बोगस फाईल शिक्षण विभागाकडे पाठवणारे संस्था चालक, सचिव, संचालक, मुख्याध्यापक आणि त्या शिक्षकांना पण त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात येवून सदरचे बोगस प्रस्ताव स्वीकारणारे जळगाव जिल्हा शिक्षण विभागातील यास जबाबदार असणाऱ्या त्या भ्रष्ट लोकांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी पुढे येत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध