Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ डिसेंबर, २०२५

थंडीच्या वाढत्या प्रमाणात भाजपाचा सामाजिक उपक्रम : शिरपूर करवंद नाक्यावर गरजू महिलांना शाल वाटप



शिरपूर  प्रतिनिधी - शिरपूर शहरातील करवंद नाका भाजपा शाखेच्या वतीने थंडीच्या वाढत्या प्रमाणाचा विचार करून गरजू महिलांसाठी शाल वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. थंडीपासून संरक्षण मिळावे व सामाजिक बांधिलकी जपली जावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.


या वेळी आमदार श्री. अमरीशभाई पटेल यांचे प्रेरणादायी विचार उपस्थितांना सांगण्यात आले. “एखादी लढाई जिंकल्यावर कोणी सिकंदर होत नाही आणि एखादी लढाई हरल्यावर कोणी फकीर होत नाही” हा संदेश समाजसेवेच्या भावनेतून कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे नमूद करण्यात आले.

या उपक्रमासाठी प्रेरणास्थान म्हणून श्री. चिंतनभाई पटेल साहेब यांचे मार्गदर्शन लाभले, तर श्री. भालेराव भाऊ माळी यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुकेश माळी, दिनेश कोळी, परशु भाऊ, चंदू सोनवणे, चंदू पाटील व नानाभाऊ यांनी अनमोल सहकार्य केले.

यावेळी करवंद नाका भाजपा शाखेचे अध्यक्ष गोपाल माळी, विशाल माळी तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक उपक्रमाबद्दल लाभार्थी महिलांनी आयोजकांचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध