Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ डिसेंबर, २०२५

अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था राष्ट्रीयमहा सचिव गजानन दादा साटोटे यांचा विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा



शेगांव शहर प्रतिनिधी: (उमेश राजगुरे) अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था
राष्ट्रीय महासचिव माननीय श्री गजानन दादा साटोटे यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी महिलांसाठी साडी-चोळी वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास असंख्य कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हा कार्यक्रम समाजसेवक तथा ज्येष्ठ नागरिक आत्मारामजी म्हात्रे (अकोला) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तसेच समाजसेवक पवन भाऊ कानपुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.महिलांची निवड अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ. सविताताई डाहे (आसेगाव पूर्णा) यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ. सविताताई डाहे यांनी केले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवक आत्मारामजी म्हात्रे यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी महिलांनी समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, महिला व पुरुषांनी एकजुटीने संघर्ष करावा तसेच युवक-युवतींनी पुढे येऊन समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करावे, असा संदेश समाजबांधवांपर्यंत पोहोचविला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समाजसेवक पवन भाऊ कानपुरे यांनी केले.

या वेळी उपस्थित माता-भगिनींनी “हॅप्पी बर्थडे टू यू” म्हणत गजानन दादा साटोटे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त केक कापून दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.गजानन दादा साटोटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक व खूप खूप शुभेच्छा! 

भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख श्री उमेश सुरेशराव राजगुरे






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध