Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी लागवड उद्ध्वस्त १,७०२ किलो गांजा नष्ट; ८५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी लागवड उद्ध्वस्त १,७०२ किलो गांजा नष्ट; ८५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
शिरपूर प्रतिनिधी- दिनांक १६/१२/२०२५ रोजी मा. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाली की गणपत साहेबराव पावरा, रा. महादेव दोंदवाडा, ता. शिरपूर, जि. धुळे याने वनविभागाच्या जमिनीवर गांजा (कॅनबीस) अंमली पदार्थ वनस्पतीची बेकायदेशीर लागवड केली आहे.या माहितीच्या आधारे मा. पोलीस अधीक्षक, धुळे तसेच मा. मुख्य न्याय दंडाधिकारी, धुळे यांच्या परवानगीने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून छापा कारवाई करण्यात आली.
महादेव दोंदवाडा शिवारातील वनजमिनीवर करण्यात आलेल्या या छाप्यात आरोपीने गांजा कॅनबीस अंमली पदार्थ वनस्पतीची लागवड केल्याचे निष्पन्न झाले. सदर कारवाई कार्यकारी दंडाधिकारी व पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली. या ठिकाणाहून एकूण १,७०२.७२ किलो वजनाचा, सुमारे ८५,१३,६००/- रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेला मुद्देमाल मा. कार्यकारी दंडाधिकारी व पंचासमक्ष जागीच नष्ट करण्यात आला.
याप्रकरणी पोकॉ/१६७६ भुषण पाटील यांनी तक्रार दाखल केली असून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. ३१६/२०२५ अन्वये NDPS कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(क) व २२(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोसई मनोज कचरे हे करीत आहेत. आरोपी गणपत साहेबराव पावरा यास अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यास दिनांक २०/१२/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक धुळे श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग श्री. सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
सदर कारवाईत पोसई मनोज कचरे, पोसई मिलिंद पवार, पोहेकॉ जाकीर शेख, जगन्नाथ कोळी, संतोष पाटील, राजू ढिसले, संदीप ठाकरे, सागर ठाकुर, चत्तरसिंग खसावद, मुकेश पावरा, ग्यानसिंग पावरा, रोहिदास पावरा, भुषण पाटील, योगेश मोरे, प्रकाश भिल, राकेश माळी, वाला पुरोहित, गुरुदास बडगुजर, सुनील पवार, संजय भोई, विजय ढिवरे, धनराज गोपाळ, मनोज पाटील, गिरधर पाटील आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
शिरपूर तालुका पोलीसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थांविरोधातील लढ्यात मोठे यश मिळाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर प्रतिनिधी :- दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन चोपडा तालुक्यातील घुमावल येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना 12 रोजी दुपारी 12 वाज...
-
तरुणी बेपत्ता शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा संशय अमळनेर तालुक्यातील कळंबु येथे शेतात कामासाठी गेलेली १५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा