Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

सोराबजी पोचखानवाला यांना अभिवादन

       
 
थाळनेर (वार्ताहर):-सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्थापनेला ११५ वर्ष पूर्ण झाल्याने शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील शाखेत बँकेचे संस्थापक सर सोराबजी पोचखानावाला यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
        
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाखा प्रबंधक प्रांजली शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बँकेचे संस्थापक सर सोराबजी पोचखानावाला यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.ज्या काळात बँकिंग क्षेत्रावर ब्रिटीश बँकांचे वर्चस्व होते,त्या काळात भारतीयांनी स्वतःच्या बँका चालवाव्यात हा 'स्वदेशी' विचार सर पोचखानवाला यांनी मनाशी बाळगून वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी त्यांनी बँक ऑफ इंडियामधील आपली सुरक्षित नोकरी सोडून २१ डिसेंबर १९११ रोजी त्यांनी सेंट्रल बँकेची स्थापना केली.त्यांनी त्यांच्या ब्रिटीश मॅनेजरला आत्मविश्वासाने सांगितले होते की, "एक दिवस माझी बँक तुमच्या बँके पेक्षा मोठी असेल." त्यांनी हे स्वप्न १२ वर्षांतच पूर्ण करून दाखवले असे शाखा प्रबंधक प्रांजली शिंदे यांनी आपल्या मनोगतातून बँक स्थापने विषयी माहिती सांगितली.त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित ग्रामस्थानी सर सोराबजी पोचखानावाला यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
         
यावेळी कार्यक्रमास बँकेचे असिस्टंड मॅनेजर हेमंत पाटील, वरीष्ठ लिपिक महेश माळवदे,बँक बी.सी.प्रदीप मराठे,योगेश बोरसे,अरुण रायसिंग,निखिल रहाणे,सुनिल शिरसाठ,रविंद्र माळी,अनिल माळी,साहिल शिंदे,बचत गटाच्या सी.आर.पी. माधुरी पाटील,गौरी परदेशी, प्रतिभा ठाकरे,अंबिका पवार, शोभा जमादार,शारदा जमादार, सुनीता मराठे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध