Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २२ डिसेंबर, २०२५
पंचायत समिती एरंडोल येथे निशुल्क पिरॅमिड धानाचे आयोजन
(कृष्णा अरुण महाजन एरंडोल तालुका जिल्हा जळगाव प्रतिनिधी )_आंतरराष्ट्रीय ध्यान दिन दरवर्षी 21 डिसेंबर रोजी जगभर साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी पंचायत समिती एरंडोल येथील हॉलमध्ये , श्री भगवती क्लासेस, एरंडोल यांच्यावतीने निशुल्क पिरॅमिड धानाचे आयोजन करण्यात आले होते. ध्यान मास्टर देवयानी कृष्णा महाजन यांनी सुरुवातीला पिरॅमिड ज्ञानाचे महत्त्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गाला सांगितले. ध्यानामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होते .मन एकाग्रतेची क्षमता वाढवते. सदर कार्यक्रमाप्रसंगी श्री दादाजी एकनाथ जाधव (गट विकास अधिकारी पंचायत समिती एरंडोल), श्रीमती प्रतिभा भीमराव सुर्वे (सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती एरंडोल) तसेच श्री.डी.एस. माळी(सहा.प्रशासन अधिकारी),श्री.योगेश पाटील(कनि.प्रशासन अधिकारी), सर्व विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, व सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
धुळे प्रतिनिधी - स्व.सुताम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट, धुळे संचलित श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा