Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

महाराष्ट्रभरातून भोई समाजाचे ३८ उमेदवार नगरसेवक



नव्या युगाला स्वप्न दावणारा अभिमान हो... 
समाज क्रांतीचा ध्वज हो...
या युगाचा अंधार सावरून 
नव्या युगाची मशाल हो...
हे भोया 
तू मान हो 
तू सन्मान हो...

महाराष्ट्रभरात भोई समाजाने फडकवला क्रांतीचा ध्वज महाराष्ट्रभरात भोई समाजाचे एकूण ३८ उमेदवार नगरसेवक होऊन भोई समाज इतिहास घडवल्याचा साक्षीदार बनला आहे. नव्या पिढींसाठी नव्या उमेदीचा किरण बनला आहे . ज्याच्या पदरात नियती पिढ्यानपिढ्या फाटकी तुटकी जिंदगी टाकत आली. नियतीने भिकेत दिलेली फाटकी तुटकी जिंदगी कष्टाच्या घामात भिजून पाषाण झालेल्या देहावर दारिद्र्याचे घाव सोसत भोई समाज आता सुखाच्या दिवसाकडे वळता झाला आहे. स्वतःचं आयुष्य  मढवता झाला आहे. माझा भोई समाज आता परिस्थितीवर मात करता झाला आहे.‌ तो लढता झाला आहे. 

नशिबांच्या भोगांवर मात करतो आता
रडत बसत नाही ,भोगाला ढाल करुन 
लढायला शिकलो आता परिस्थितीशी लढता लढता जिंकण्याचं बळ पंखात भरले आता 
मनाशी ठरवलं आता परिस्थितीवर मात करायची शिक्षणाची गंगा घराघरात न्यायची 
मुलांबाळांना शिकवायचं आता रडायचं नाही आता लढायचं आता... 

समाज सुशिक्षित आणि सुसंस्कृत तसेच प्रगतशील होत असल्याचे पुरावे म्हणजेच आजचा हा निकाल नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातून भोई समाजाचे ३८ उमेदवार नगरसेवक पदाचे दावेदार बनले.  

१) श्री.नारायण येलेरवाड भोई -लोहा २) श्री.सतीश उशोल भोई -धर्माबाद ३) सौ. गंगाबाई नारायण कोल्हे भोई -किनवट ४) सौ.शिवानी काथवटे भोई - शेवगाव -अहिल्यानगर ५) सौ. प्रियंका अमोल काशीद भोई -राहुरी- अहिल्यानगर ६) सौ.प्रियंका आडगुलवाड भोई -उमरी ७) श्री.संदीप आपटे भोई -हुपरी ८) श्री.बजरंग लिंबोरे भोई -पैठण  ९) श्री.सुरेश अण्णा नेमाडे भोई - गंगापूर 
१०) श्री.दत्तात्रय दासकर भोई -नळदुर्ग धाराशिव 
११) श्री.शशिकांत पुदाले भोई - नळदुर्ग धाराशिव 
१२) श्री.सोमनाथ हुशारे भोई -मंगळवेढा १३) श्रीमती. इंदुबाई घट्टे भोई -बुलढाणा १४) सौ.अपर्णा किशोर सिद्धे भोई -अक्कलकोट सोलापूर १५) श्री.सचिन रामचंद्र तारु भोई -भोर- पुणे १६) सौ.पल्लवी समीर सागळे भोई -भोर-पुणे १७) श्री.गणेश बाळू मोहिते भोई -भोर- पुणे
१८) श्री.अमित ज्ञानोबा सागळे भोई -भोर-पुणे 
१९) सौ.आकांक्षा योगेश वाघवले भोई-वडगाव-पुणे
२०) श्री.नितीन मगरे भोई -मेढा २१) श्री.घनश्याम पिंटू चक्की भोई -वाई -खडाळा-सातारा २२) सौ.आशा मुळे भोई -कराड -सातारा २३) श्री.अभिषेक डहारे भोई -रामटेक २४) सौ. लक्ष्मीबाई आहिकर भोई -रामटेक 
२५) श्री.माणिकराव ताकोद भोई - रामटेक  
२६) श्री.अमोल कचरु इंदारखे भोई -भगूर 
२७) श्री.वाल्मिक लहीरे भोई -कोपरगाव- अहिल्यानगर  २८) श्री.नरेंद्र एकनाथ भोई - वरणगाव  २९) सौ.लताबाई शिवदे भोई -शहादा  ३०) सौ.केतकीताई राजेश भोई -शिरपूर  ३१) सौ.पुष्प पंकज मोरे भोई -अमळनेर 
३२) श्री.संदीप आपटे भोई -हुपरी  ३३) सौ.गंगाबाई नारायण कोल्हे भोई- किनवट ३४) सौ.मीनाक्षी गेडाम भोई आरमोरी- गडचिरोली ३५) श्री.गुट्टी मारबते भोई- गडचिरोली ३६) सौ. वर्षा पढाल भद्रावती भोई- चंद्रपूर ३७) श्री.गौरव नागपुरे भद्रावती भोई- चंद्रपूर ३८) ॲड. सौ.शुभांगी विजय काथवटे भोई- सातारा

ही सर्व भोई समाज मंडळी आज राजकीय क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण करुन समाजाचे इतिहासात नोंद केल्याची जिवंत साक्ष आहे. जनतेतून नगरसेवक होऊन आपला अस्तित्व निर्माण करणाऱ्या समस्त भोई समाज बंधू भगिनींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...

समस्त भोई समाजसेवकांना विनंती करतो की, राजकीय अस्तित्व हे, असे एक ब्रह्मास्त्र आहे. की हे अस्र नव्या जून्या पिढीला आपलं, आपल्यापाशी हवे नको सर्वस्व पणाला लावायला मजबूर करणारे आहे . २१ डिसेंबर २०२५ चा भोई समाजाचा हा राजकीय इतिहास येणाऱ्या पिढ्यांसाठी पाठबळ देणारा इतिहास झाला आहे .या राजकीय अस्तित्वातून या भारतीय समाजाला भोई समाजाच्या नेतृत्वाचा अभिमान वाटावा अशी समाजसेवा आपल्या हातून घडो ! समाज अजून प्रगती पथावर जावो ! ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरुन शुभेच्छा...

                            
                  - लक्ष्मण वाल्डे -कन्नड 
                   मो.नं : 8888606068
---------------------------------------




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध