Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

बनावट शालार्थ आयडी घोटाळा : शरद शिंदेच्या जामीन अर्जावर सुनावणी, निर्णय रखडला नाशिक सत्र न्यायालयात युक्तिवाद; पुढील तारीख ८ जानेवारी २०२६, आरोपी अमळनेरमध्येच असल्याची चर्चा



नाशिक प्रतिनिधी- राज्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातील कथित मुख्य सूत्रधार शरद शिंदे याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर नाशिक सत्र न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने जामीन अर्जावर आदेश न देता पुढील सुनावणी दिनांक ०८ जानेवारी २०२६ रोजी ठेवली आहे.

•आरोपी अमळनेरमध्येच असल्याचे  खात्रीचे वृत्त

दरम्यान, आरोपी शरद शिंदे अद्याप अमळनेर (जि. जळगाव) येथेच वास्तव्यास असल्याचे विश्वसनीय वृत्त समोर येत असून, एवढ्या गंभीर आर्थिक गुन्ह्यातील आरोपी खुलेआम फिरत असल्याने तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर व हेतूंवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर आरोपीच्या हालचालींबाबत माहिती असूनही त्याला अटक का करण्यात आलेली नाही, असा सवाल नागरिक, शिक्षक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

शालार्थ प्रणालीचा गैरवापर करून बनावट शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी दाखवून शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचा पगार उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप शरद शिंदे व त्याच्या टोळीवर आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक करत असून आरोपीवर भा.दं.वि. कलम 409 (विश्वासघात), 420 (फसवणूक) व इतर गंभीर कलमे लावण्यात आलेली आहेत.
न्यायालयीन 

•सुनावणीतील घडामोडी

•२२/१२/२०२५ रोजी झालेल्या सुनावणीत
सरकारी वकिलांनी तपास अद्याप सुरू असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आरोपीच्या जामीनास तीव्र विरोध करण्यात आला
•प्रकरणाचे गांभीर्य, आर्थिक नुकसान व संभाव्य पुरावे नष्ट होण्याची शक्यता लक्षात घेता न्यायालयाने कोणताही तातडीचा निर्णय न देता सुनावणी पुढे ढकलली
तपासावर संशय, दबावाखाली कारवाई तर नाही ना?
•या प्रकरणातील इतर लाभार्थी, मध्यस्थ, तसेच शासकीय अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप उघड झालेली नाही. त्यामुळे तपास यंत्रणा दबावाखाली तर काम करत नाहीत ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी मोकाट असताना पुरावे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संपत्ती विश्वासातील लोकांकडे वर्ग?
याशिवाय, आरोपीकडून घोटाळ्यातून मिळवलेली संपत्ती आपल्या विश्वासातील व्यक्तींच्या नावे वर्ग केली जात असल्याचीही चर्चा आहे. यामुळे भविष्यात शासनाच्या निधीची वसुली करणे अवघड होऊ शकते. या सर्व घडामोडी तपास यंत्रणांनी तातडीने दखल घेण्यासारख्या असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

जनतेची मागणी

•शिक्षण क्षेत्रातील या बहुचर्चित घोटाळ्यात
आरोपीस तात्काळ अटक
•संपूर्ण घोटाळ्याचा सखोल व निष्पक्ष तपास
•दोषींवर कठोर कारवाई व शासनाच्या निधीची वसुली यासाठी जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत असून न्यायालय व तपास यंत्रणांकडे कठोर भूमिकेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध