Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

समोरून येणाऱ्या ट्रक ने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार


अमळनेर : समोरून येणाऱ्या ट्रक ने
मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना 24 रोजी दुपारी 1 वाजता तालुक्यातील गलवाडे रस्त्यावर केसरी हॉटेल जवळ घडली.

ईश्वर आनंदा पाटील व समाधान भिकन पाटील दोन्ही रा गलवाडे हे दोघे मोटरसायकल क्रमांक एम एच 19 ई डी 9559 हिच्यावर अमळनेर जात असताना समोरुन ट्रक क्रमांक आर जे 14 जी जे 9136 ने भरधाव वेगात येऊन धडक दिल्याने मोटरसायकल सह दोन्ही खाली कोसळले. दोघांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले होते. गावातील लोकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी ईश्वर आनंदा पाटील यांना मृत घोषित केले. तर समाधान पाटील याला गंभीर जखमी असल्याने धुळे येथे रवाना करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा धुळे येथे मृत्यू झाला आहे

ट्रक चालक धडक मारून पळून गेला होता. लोण फाट्याजवळ सदर ट्रक मारवड पोलिसांच्या पथकाने पकडत ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. सदर पथकात पीएसआय विनोद पवार, हेकॉ संजय सूर्यवंशी, हेकॉ सुमित गिरसे, हेकॉ सुनील राजाराम पाटील, हेकॉ साबे यांचा समावेश होता.

ट्रक चालक रुस्तम जैनू रा भूतलाका सहसौला मेवात हरियाणा यांच्याविरुद्ध मयताच्या चुलत भाऊ विश्वास भगवान पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरुन भारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 281,125 (अ), 125 (ब),324 (3), मोटरवाहन अधिनियम 1988 च्या कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध