Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

श्री तेजमल गांधी कनिष्ठ विज्ञान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवला द्वितीय क्रमांक



उमरखेड तालुका प्रतिनिधी :: सुभाष वाघाडे
उमरखेड :: यवतमाळ  जिल्हा अखिल कुणबी समाज द्वारा संचालित मॉडर्न पब्लिक स्कूल उमरखेड येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे( स्वयं अर्थसहित) दिनांक 21/ 12 /2025 रोजी आयोजन करण्यात आले होते सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये उमरखेड महागाव या दोन तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदविला होता त्यामधून श्री तेजमल गांधी कृषी विद्यालय ब्राह्मणगाव येथील वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी Smart gogal and smart stick या प्रयोगाचे प्रदर्शन करून द्वितीय क्रमांक मिळविला त्याबद्दल आज दिनांक 24 /12 /2025 रोजी शालेय स्तरावर साई निमलवाड अंशुमन नाईक पुष्पगुच्छ ,प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह ,बक्षीस विद्यालयाचे मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक ,समन्वयक यांच्या हस्ते देण्यात आले तसेच मार्गदर्शक शिक्षक आनंद सोनटक्के सरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री अनिरुद्ध पाटील साहेब संस्थेचे सचिव सौ अश्विनीताई पाटील मॅडम विद्यालयाचे चेअरमन आदरणीय श्री डॉ विजयराव माने साहेब विद्यालयाचे मार्गदर्शिका ॲड सौ अर्चनाताई विजयराव माने मॅडम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विष्णूजी नागोजी सादूडे सर पर्यवेक्षक हरिभाऊ खोकले सर समन्वयक आदरणीय गावंडे सर पत्रकार बंधू सुभाषराव वाघाडे साहेब सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधूंनी अभिनंदन केले




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध