Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

शिरपूर तालुक्यातील शाळेत नियमांना हरताळ? लाचलुचपत प्रकरणातील आरोपी पुन्हा सेवेत कसे?



शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यातील एका शाळेवर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) केलेल्या कारवाईत अटक झालेले व सध्या जामिनावर असलेले आरोपी त्याच संस्थेत पुन्हा रुजू कसे केले गेले? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबन व विभागीय चौकशी अपेक्षित असताना, संस्थेने कोणत्या नियमांच्या आधारे त्यांना सेवेत कायम ठेवले, हे अद्याप अस्पष्ट आहे.

विशेष म्हणजे आरोपी व तक्रारदार एकाच आस्थापनेत कार्यरत असल्याने तक्रारदारावर दबाव येण्याची, साक्षीत हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब नैसर्गिक न्याय, शालेय आचारसंहिता आणि प्रशासकीय नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणात शिक्षण विभाग, संस्थाचालकांची भूमिका आणि संबंधित प्राधिकरणांची निष्क्रियता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

नागरिकांकडून दोषींवर तात्काळ कारवाई, आरोपींचे निलंबन आणि स्वतंत्र चौकशीची मागणी होत आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध