Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५
प्रेस क्लब ॲाफ इंडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पत्रकाराची निवड अध्यक्षपदी झालीय. काल झालेल्या निवडणुकीत संगीता बरुआ पिशारोती यांचे पॅनेल पूर्ण बहुमताने निवडून आले. त्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या आहेत. एक झुंजार व अभ्यासू पत्रकार म्हणून त्या ओळखल्या जातात.
असममधील माजुली बेटावरील मातीच्या धुपीमुळे होणाऱ्या उपजीविकेच्या नुकसानावर आधारित रिपोर्टिंग मालिकेसाठी 2011 मध्ये त्यांना सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीजची फेलोशिप मिळाली होती.
2017 मध्ये दिल्लीतील हिंदू-मुस्लिमांमधील, घरांच्या धार्मिक विभाजनावरच्या रिपोर्टिंगसाठी रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड त्यांना मिळालेलं. हा रिपोर्ताज विलक्षण गुंतागुंतीचा व काहीसा धोकादायक असूनही त्यांनी जिद्दीने पूर्णत्वास नेला. मुंबई आणि उपनगरात मराठी माणसांना घरे मिळत नसल्याच्या गोष्टी आपण नेहमीच करतो, मात्र संगीता बारुआ यांनी जसा रिपोर्ताज केला होता तशी कामगिरी आजवर कोणत्याही मराठी पत्रकारास का जमली नसेल हा प्रश्न अस्वस्थ करतो. असो.
संगीता बरुआ यांची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली ती त्यांच्या पुस्तकामुळे. 'Assam: The Accord, The Discord' हे त्यांचे पहिले पुस्तक. जे असम करार, असम आंदोलन आणि बंडखोरी यावर आधारित आहे. थक्क करणारे संशोधन, हजारो कागदपत्रांचा अभ्यास, शेकडो मुलाखती आणि असमच्या भौगोलिक राजकीय सामाजिक आर्थिक व जातधर्मीय परिप्रेक्ष्याचा हा दणकट दस्तऐवज आहे.
या पुस्तकाचा पुढचा टप्पा असणारे त्यांचे दुसरे पुस्तक दोन वर्षांपूर्वी आलेय. The Assamese: A Portrait of a Community' या पुस्तकात असमच्या संस्कृती आणि समुदायावर अतिशय अभ्यासपूर्ण नोंदी आहेत, सखोल माहिती आहे. असमचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी हे अवश्य वाचावे.
संगीता यांनी ‘द हिंदू‘ या वृत्तपत्रात विशेष प्रतिनिधी म्हणून काम केलेय, नंतर ‘द वायर‘ या डिजिटल माध्यमात डेप्युटी एडिटर/नॅशनल अफेअर्स एडिटर म्हणून उत्तर-पुर्व भारत, राजकारण आणि संस्कृतीवर लेखन केले आहे. उत्तर पुर्व भारताविषयीची त्यांची निरीक्षणे बेहद्द लाजवाब असतात.
एखादा माणूस तेव्हाच चांगला पत्रकार होऊ शकतो जेव्हा तो त्याच्या पेशासोबत प्रामाणिक असतो, त्याच्या मांडणीला अभ्यासाची जोड असते, तो मेहनतीने वास्तव जाणून घेतो आणि कोणतीही तडजोड न स्वीकारता त्याचे काम सच्चेपणाने करतो. संगीता बरुआ निष्ठेने आणि अभ्यासपूर्ण मेहनतीने या पदापर्यंत पोहोचल्या आहेत.
प्रेस क्लब ॲाफ इंडियाच्या 68 वर्षांच्या इतिहासात त्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या आहेत. ही गोष्ट साधी नाही. महिला पत्रकारांचे फिल्ड अधिक आव्हानात्मक व थकवणारे आहे, या पार्श्वभूमीवर संगीता बरूआ यांचे यश ठळकपणे उठून दिसते. त्यांचे कौतुक तर झालेच पाहिजे.
अभिनंदन Sangeeta Barooah Pisharoty ! आपल्या कारकीर्दीत प्रेस क्लब ॲाफ इंडियाच्या वाटचालीस नवी दिशा लाभो!
- समीर गायकवाड
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
तरुणी बेपत्ता शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा संशय अमळनेर तालुक्यातील कळंबु येथे शेतात कामासाठी गेलेली १५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्...
-
अमळनेर तालुक्यातील गांधली येथील तरुणीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गांधली येथील ज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा