Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २० डिसेंबर, २०२५
आयुष्य खरंच खुप सुंदर आणि मोठ आहे फक्त ते जगता आल पाहिजे
संकटे नेहमीच त्याच्या वाटेला येतात, ज्यात ती पेलण्याची ताकद असते. परंतु हे आजच्या युवकांना समजावून सांगण खुप कठीण आहे, आजचे युवक संकटे आलीत तर दोनच गोष्टी करतात, एक म्हणजे माघार घेतात दुसरं डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्या करतात. परंतु या गोष्टी घडत असताना नेमकी चूक कुणाची असते हे समजून घेणं देखील तेवढच महत्वाच आहे. मित्र जरूर असावीत परंतु ती वाईट मार्गाला नाही तर आपल्या करिअर घडवण्याच्या मार्गाने घेऊन जाणारी असावीत. आणि जर आपलाच मित्र आपल्याला वाईट मार्गला घेऊन जात आहे हे कळून देखील न कळण्या सारख आपण वागत आहोत, तर मग आपल्या आयुष्याचे खरे शिल्पकार आपणच आहोत, असे म्हणण्यास हरकत नाही.
आम्ही 7 मित्र होतो सर्वांची परिस्थिती नाजूक होती परंतु सर्वांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त पोलीस भरती होती आम्ही रोज सकाळी चार वाजता उठायचो आणि सर्वजण माझ्या दुकानावर भेटायचे ( नवजीवन टी स्टॉल सारंगखेडा ) तेथून कहाटूळ रस्त्यावर पाच किलोमीटर धावत असायचो मग रस्त्यात खड्डा असो किंवा समोर कुठलाही प्राणी याची अजिबात मनात भीती नसायची, कारण डोळ्यासमोर आम्ही ध्येय ठेवलं होतं आणि ते आम्हाला साकार करायचं होतं पहाटे चार ते साडेचार पर्यंत पाच किलोमीटर धावून झाल्यानंतर पाच ते सहा वाजेपर्यंत लांब उडी मारणे गोळा फेकणे 100 मीटर धावणे असा आमचा सरावाचा वेळ होता आणि मग सहा वाजेनंतर आमच्या दिवसाची सुरुवात होत होती सात मित्रापैकी तीन मित्र हे दगड फोडण्याचे काम करण्यासाठी खदांमध्ये जात असतात आणि उर्वरित चार मित्र हे आपले शॉपिंग उघडण्यासाठी जात होते मग पुन्हा दुपारी बारा वाजता साईबाबा मंदिर येथे येऊन एक ते पाच वाजेपर्यंत साईबाबा मंदिर वर अभ्यास असायचा त्यातून आपसात प्रश्न तयार करणे एक दुसऱ्यांना प्रश्न उत्तर करणे असा तो क्रम असायचा पुन्हा सायंकाळी सहा वाजले की शारीरिक सरावासाठी कार्टून रस्त्याला जात असतात मग तेथून सुरुवात करायची आणि पांढरी हनुमान मंदिर पर्यंत धावणे जवळपास पाच ते सहा किलोमीटर असा आमचा नित्यक्रम असायचा आणि मग रात्री नऊ ते एक वाजेपर्यंत पुन्हा दत्त मंदिर वर अभ्यास असायचा म्हणजे आमची झोप हसायची फक्त चार्ज ते पाच तासाची आमच्या सर्वांचा मनात एकच देव होतं ते म्हणजे नोकरी करणं आई-वडिलांची मान अभिमानाने आणि स्वाभिमानाने समाजात उंचवणं हेच आमचं कर्तव्य होतं यापेक्षाही मोठी गोष्ट ती म्हणजे साथ मित्रान पैकी एकाही मित्राला कुठलाही व्यसन न होतं आणि याचा फायदा आमचा आयुष्यात झाला सन 2016 मध्ये भरती निघाली सर्वजण ग्राउंड ला उतरलेत चार मित्रांनी शंभर पैकी 90 मार्क मिळवले होते आणि इतर तीन मित्रांनी 90 च्या आत मार्क मिळवले होते ग्राउंड ची लिस्ट लागली तेव्हा सर्वच मित्र त्या लिस्टमध्ये पास झाले होते..
नंतर मग फक्त आणि फक्त अभ्यास मग आम्ही सर्वांनी लेखी परीक्षा दिली आणि एकाच भरतीत तीन मित्रांनी गहू-घवीत यश मिळवून नोकरी प्राप्ती केली यापेक्षा आम्हाला आनंद होत आहे की जे मित्र सकाळी दगड फोडण्यासाठी जात होते तेच माझे मित्र फायनल लिस्टला आली होती परंतु त्यांना दुःख होतं की आमचे चार मित्र लिस्ट ला आले नाहीत परंतु आम्ही सर्वांनी एका जागेवर शांत बसून एकमेकांना समजावलं आणि ठरवलं की आपण पोलीस नाही बनू शकलो परंतु वेगवेगळ्या क्षेत्रात आपण अशाच प्रामाणिक प्रमाणे मेहनत घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या आई-वडिलांचं नाव मोठं करणं असा निश्चय आम्ही घेतला आणि मग प्रवास सुरू झाला नवीन मार्गाचा...
काही दिवसानंतरच मी बँक क्षेत्र निवडली आणि मी बँकेत माझं करिअर घडवलं त्याचबरोबर इतर तीन मित्रांनी बिजनेस सुरू केला व त्यांनी देखील घवघवीत यश आपल्या बिजनेस मध्ये मिळवलं सर्वच मित्र आपल्या करिअरमध्ये ईश्वर आहेत आणि या ठिकाणी आनंदाने सांगावसं वाटतं अजून एकही मित्राला कुठलाही व्यसन नाही..
मेहनत इतनी शांती से करो किस सफलता शोर मचा दे ||
या गोष्टीवरून एक तात्पर्य एवढाच आहे की आयुष्यात शंभर मित्र जवळ ठेवण्यापेक्षा दहा मित्र चांगले जवळ ठेवा जे भूतकाळाचं नाही तर भविष्याचा आणि आपल्या आयुष्याचा विचार करतील म्हणून म्हणतो संकटे ज्यावेळेस तुमच्या समोर तर तेव्हा ती संधी असते जी तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचे असते
जगदीश कांतिलाल भावसार
सारंगखेडा 9049598848
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर प्रतिनिधी :- दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन चोपडा तालुक्यातील घुमावल येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना 12 रोजी दुपारी 12 वाज...
-
तरुणी बेपत्ता शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा संशय अमळनेर तालुक्यातील कळंबु येथे शेतात कामासाठी गेलेली १५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा