Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ डिसेंबर, २०२५

कारमध्ये होरपळून सुरतच्या चालकाचा मृत्यू शिरपूर तालुक्यातील खामखेडा रस्त्यावर भीषण घटना



शिरपूर प्रतिनिधी -धावत्या कारला अचानक आग लागल्याने सुरत येथील एका कार चालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील खामखेडा रस्त्यावर बुधवार, 17 डिसेंबर 2025 रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

चंद्रकांत प्रताप धिवरे (वय 40, रा. खामखेडा प्रथा, ता. शिरपूर, सध्या रा. सुरत) असे मयत चालकाचे नाव आहे. ते कार क्रमांक GJ-06-JO-6325 मधून प्रवास करत असताना अचानक कारने पेट घेतला. काही क्षणांतच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की चालकाला कारमधून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कार पूर्णतः जळून खाक झाली होती आणि चालकाचा होरपळून मृत्यू झाला होता.

कारला अचानक आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध