Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ डिसेंबर, २०२५

पाथर्डी फाटा उड्डाणपुलावर एसटी बसला भीषण आग नाशिकमध्ये मोठा अनर्थ टळला



नाशिक प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील उड्डाणपुलावर एसटी महामंडळाच्या नंदुरबार डेपोच्या बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे चालकाच्या निदर्शनास येताच तत्काळ प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले होते.

प्रवासी उतरवल्यानंतर रिकामी बस दुरुस्तीसाठी वर्कशॉपकडे नेत असताना उड्डाणपुलावरच बसने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने भीषण स्वरूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, बसमध्ये त्या वेळी कोणतेही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीमुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध