Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २२ डिसेंबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
“सावदा पोलिसांच्या दुर्लक्षामुळे लोहारा दुरक्षेत्र पोलिस चौकी धोक्याच्या उंबरठ्यावर; इमारत कोसळण्याची भीती, तात्काळ दुरुस्तीची जोरदार मागणी”
“सावदा पोलिसांच्या दुर्लक्षामुळे लोहारा दुरक्षेत्र पोलिस चौकी धोक्याच्या उंबरठ्यावर; इमारत कोसळण्याची भीती, तात्काळ दुरुस्तीची जोरदार मागणी”
जळगाव जिल्हा प्रतिनिधी हमीद तडवी
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सातपुडा पायथ्याशी वसलेल्या लोहारा पोलीस चौकीची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन ही पोलीस चौकी सध्या स्थितीत जीवितहानी होण्यास कारणीभूत ठरत आहे ही पोलीस चौकी अनेक वर्षांपासून पडक्या अवस्थेत आहे आणि सध्या स्थितीत जीर्ण झाली असल्याने या पोलीस चौकी परिसरात लहान मुले.महिला नागरिक ये.जा करीत असतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील ह्या पोलीस चौकी पासुन खुप मोठा धोका निर्माण झाला आहे तसेच ह्या पोलिस चौकीचे छप्पर हे जुन्या काळातील कौलारू छप्परचे असल्याने ह्या पोलीस चौकीच्या भिंतीसह कौलारू छप्पर केव्हाही कोसळु शकते.आणि या ठिकाणी खुप मोठी जीवीतहानी होऊ शकते व जिवीतहानी होण्याची दाट संभावना भासत आहे.
त्याचबरोबर ह्या पोलीस चौकी मध्ये आतील खोल्यांमध्येही घाणीचे साम्राज्य देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. यामुळे देखील परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्याचबरोबर ह्या पोलीस चौकीच्या भिंती देखील तुटुन पडलेल्या अवस्थेत आहेत.आणि पोलीस चौकीच्या आतमध्ये खाली देशी दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत आहेत यावरुन असे समजते की परिसरात अवैध धंदे देखील बोकाळले असल्याचे चित्र आहे.हा सगळा प्रकार सावदा पोलिस स्टेशन च्या अधिकारी आणि कर्मचारी यांना माहिती असल्यावरही जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे परिसरातील जनतेकडून बोलले जात आहे.
तेरी भी चुप और मेरी भी चुप अशी अशी सावदा पोलिसांची परिस्थिती असल्याने परिसरातील जनतेला लोहारा येथील पोलीस चौकी पासुन खुप मोठा धोका निर्माण झाला आहे..तरी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी साहेब यांनी या लोहारा दुरक्षेत्र पोलीस चौकी कडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ पोलिस चौकीची सुधारणा करावी आणि परिसरातील जनतेला जीवीतहानी होण्यापासून वाचवावे. अशी रास्त स्वरुपाची मागणी लोहारासह परिसरातील जनतेने जिल्हा पोलिस प्रशासनाकडे केली आहे..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
धुळे प्रतिनिधी - स्व.सुताम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट, धुळे संचलित श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा