शिरपूर तालुका भाटपुरा – भाटपुरा जिल्हा परिषद गटात 2020 पासून सुरू असलेल्या कामांवर आता भ्रष्टाचाराचा प्रचंड वास दरवळू लागला आहे. विकासाच्या नावाखाली चार वर्षे चाललेला हा कथित ‘सुवर्णकाळ’ प्रत्यक्षात कोट्यवधींच्या आर्थिक लूटमारचे साम्राज्य असल्याची चर्चा गावोगावी धगधगत आहे. कंत्राटदार–प्रशासन आणि काही प्रभावी मंडळी यांचा मिलाफ करून रचलेला भ्रष्टाचाराचा राक्षस आता उघड्यावर आला आहे, असा संताप ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
कागदोपत्री लाखो–कोट्यवधींची कामे पूर्ण दाखवली… पण जागेवर एक विटेसुद्धा हललेली नाही!
ज्या रस्त्यांची दुरुस्ती दाखवून निधी गिळंकृत केला, ते रस्ते अजूनही चिखलात बुडालेले; शाळांच्या दुरुस्त्यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये दाखवले, पण वर्गखोल्यांना छप्पर पुन्हा पडण्याची भीती; पाण्याच्या टाक्या कागदावर उभ्या — प्रत्यक्षात शेतात फक्त तण उभे!
निविदा प्रक्रियेचा खेळ तर इतका उघडकीस येऊ लागला की जणू संपूर्ण गट एका ठराविक टोळीच्या कबऱ्यातच सापडला. कमी दर्जाचे साहित्य, बनावट मोजमाप, फुगवलेली बिले, आणि काही कामांच्या फाईली तर रातोरात तयार करून फक्त शिक्के ठोकल्यासारखी प्रकरणे समोर येत आहेत.
“चार वर्षे भाटपुर्यात विकास नव्हे… तर विकासाच्या नावाखाली ‘मौज’ चालली होती!”
असा आरोप आता थेट ग्रामस्थांनीच करायला सुरुवात केली आहे. वृद्ध, शेतकरी, महिला—सगळ्यांत संताप उसळलेला. काही गावांनी तर आपल्या पातळीवर जागोजागी जागरणे काढून जबाबदारांना खुलं आव्हान दिलं आहे.
दरम्यान, हा सर्व आर्थिक ‘थरार’ पाहता अनेकांना शंका आहे की या गटातल्या अनियमितता फक्त हिमनगाचा टोक आहे, आणि यामागे अजूनही मोठे नावं, मोठे नेते आणि मोठी सांठगाठ लपलेली आहे.
संपूर्ण गावागावांत एकच प्रश्न —
या काळ्या कर्तबगारीचा खरा सूत्रधार कोण? आणि जांच प्रत्यक्ष सुरू झाली तर किती जणांचे चेहरे झडतील?
शिरपूर तालुका आता उच्चस्तरीय तपासाची मागणी करत अक्षरशः पेटला आहे.
“या गटाचा प्रत्येक हिशोब उघडा करा, नाहीतर आंदोलनाचा वणवा उठू द्या,” अशी नागरिकांची गर्जना सुरूच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा