Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ८ डिसेंबर, २०२५

शिरपूर वकील संघात प्रल्हाद महाजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब प्रचंड बहुमताने विजय



शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर वकील संघाच्या निवडणुकीत अँड. प्रल्हाद महाजन यांनी अक्षरशः झंझावाती कामगिरी करत प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. निवडणूकपूर्व चर्चेत अग्रस्थानी असलेले, न्यायासाठी लढणाऱ्या त्यांच्या धडाडीच्या स्वभावावर आणि संघटनेतील निष्ठेवर मतदारांनी पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त केला. मतमोजणीच्या क्षणापासून महाजन यांच्या नावावर पडणाऱ्या मतांची सरबत्ती सुरूच होती, आणि शेवटी विजयाची खात्री बळकट करत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना स्पष्ट अंतराने मागे टाकले.

विजयानंतर भावना व्यक्त करताना अँड. महाजन म्हणाले,
“माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व वकिल बांधवांचा मनःपूर्वक आभारी आहे. संघटनेच्या प्रगतीसाठी आणि वकिलांच्या हक्कांसाठी माझा लढा आणखी जोमाने सुरू राहील.”

शिरपूर वकील संघाच्या नव्या कार्यकारिणीत महाजन यांच्या निवडीमुळे संघटनेला नवा वेग, अधिक धारदार धोरणे आणि मजबूत कामकाज मिळेल, असा विश्वास ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पुढील काळात संघातील कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडतील, अशी व्यापक अपेक्षा जागृत झाली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध