Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २८ जानेवारी, २०२६
Home
/
/
कळवण सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रं 1 च्या वतीने जयदर येथील बेकायदेशीर अतिक्रमण काढणेसंदर्भात नोटीसा मुदतीत न काढल्यास कायदेशीर सूचना न देता काढण्यात येणार
कळवण सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रं 1 च्या वतीने जयदर येथील बेकायदेशीर अतिक्रमण काढणेसंदर्भात नोटीसा मुदतीत न काढल्यास कायदेशीर सूचना न देता काढण्यात येणार
संदीप अवधूत नाशिक ग्रामीण प्रतिनिधी
कळवण तालुक्यातील जयदर गावामध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. याबाबत आठ दिवसात सदरील अतिक्रमण काढणे कळवण सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रं 1 च्या वतीने जयदर येथील बेकायदेशीर अतिक्रमण काढणेसंदर्भास नोटीसा बजावलेल्या आहेत बस स्टॉपच्या जवळ,सरकारी दवाखाना गेट च्या जवळ रस्त्याच्या कडेला जाणारा, इरिगेशन कॉलनी जवळ रस्ता व दवाखान्याकडे जाणारा मार्गाकडे जवळील असलेला रस्ता येथील असलेल्या बेकायदेशीर जागेवर टपऱ्या/ दुकानं /बांधकामे सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा यावर उभारण्यात आलेली आहेत.आणि त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांना आठवडे बाजाराच्या दिवशी खूप वर्दळ होत आहे.
नागरिकांना रहदारीमुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. सरकारी दवाखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला टपऱ्या आहेत. त्यामुळे येण्या-जाण्यासाठी ॲम्बुलन्स वाहनांना तसेच इमर्जन्सी वाहनांना खूप त्रास सहन करावा लागतो. आजू बाजूला टाकलेल्या घाणीमुळे अस्वच्छता पसरत आहे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हे बांधकाम पूर्णपणे अनाधिकृत आणि शासकीय भूखंड आणि एरिगेशनच्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण केलेले आहे. तसेच कायद्याचा नियमाचा भंग केला आहे.
या अतिक्रमणांमुळे सार्वजनिक जागेवर अडथळा निर्माण होत आहे. आणि परिसराची स्वच्छता व सुव्यवस्था बिघडत आहे. या अतिक्रमणांमुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या कडून सर्व अतिक्रम करणाऱ्या दुकानदारांना नोटीस देऊन कळविण्यात आलेअसुन आठ दिवसात स्वतःहून अतिक्रमण काढण्याचे आदेश नोटीसमध्ये नमूद आहे .
अतिक्रमणधारकांना संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटीस देऊनही आठ दिवसामध्ये काढण्यास सांगूनही टपऱ्या/ दुकानं काढण्यात आलेले नाही. यावर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. या प्रकरणात लक्ष घालून बेकायदेशीर टपरी आणि दुकाने हटवण्याची व्यवस्था करावी या अनधिकृत टपऱ्या/बांधकामाची त्वरित दखल घेऊन, संबंधित विभागामार्फत कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण हटवावे असा सूर नागरिकांनमधून उमटत आहे.
चौकट
1) सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रं 1 चे अधिकारी हे केवळ कागदी घोडे नाचवतात अतिक्रमण धारकांना नोटीसा काढण्याचे नावीन्यपूर्ण काम करतात त्यावर मुदत आठ दिवसांची टाकतात त्यांना अक्षरशः अतिक्रण पूर्णपने डोळ्याला दिसत परंतु नोटीस काढून आठ दिवसापेक्षा जास्त दिवस झाले असूनही कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई नाही केवळ नोटीस काढून अतिक्रमण धारकांना धमकी दिली जाते कारवाई गुलदस्त्यात अधिकाऱ्याचे काम म्हणजे पुढे पाठ मागे सपाट अशी गंमत झाली - यशवंत पालवी सामाजिक कार्यकर्ता
2) यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही अतिक्रमण धारकांना नोटीसा दिलेल्या होत्या परंतु आठ दिवस उलटून बराच कालावधी झाला परंतु अतिक्रमण काढले नाही अधिकाऱ्यांची केवळ हाताची घडी तोंडावर बोट अशी परिस्थिती आहे - दिलीप खांडवी ग्रामस्थ जयदर
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बोराडी प्रतिनिधी : येथील ग्रामदैवताच्या दोन दिवसीय यात्रेला मंगळवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असला, तरी पहिल्याच दिवशी सुरक्षेच्या च...
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर बस स्थानकात हातचलाखीने चोरी करणारा अवघ्या ४ तासांत जेरबंद ५०,००० रुपये रोख रक्कम हस्तगत शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा