Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २८ जानेवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
बोराडी यात्रेत छेडछाडीचा धुमाकूळ; पोलिसांच्या उदासीनतेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
बोराडी यात्रेत छेडछाडीचा धुमाकूळ; पोलिसांच्या उदासीनतेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
बोराडी प्रतिनिधी : येथील ग्रामदैवताच्या दोन दिवसीय यात्रेला मंगळवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असला, तरी पहिल्याच दिवशी सुरक्षेच्या चिंधड्या उडाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. बोराडी पोलीस बीट कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे यात्रेत मुलींच्या छेडछाडीच्या घटनांत मोठी वाढ झाली असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची गर्दी असताना, सुरक्षेची जबाबदारी असलेल्या बीट कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात टवाळखोर उच्छाद मांडत असताना पोलीस कर्मचारी मात्र मद्य आणि मटनाच्या पार्ट्या झोडण्यात मग्न होते. पोलिसांच्या या बेजबाबदार वर्तणुकीमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे.
गावातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्राम सुरक्षा दलाला प्रोत्साहन देण्याऐवजी, पोलिसांनी उलट त्यांनाच दोषी ठरवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. "अर्थपूर्ण" व्यवहारातून पोलिसांनी गुन्हेगारांना पाठबळ दिले असून प्रामाणिक कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याची चर्चा आता गावात रंगली आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि मद्य-मटनाच्या पार्ट्यांमध्ये दंग राहणाऱ्या दोषी बीट कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी आग्रही मागणी बोराडी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. बुधवारी यात्रेचा शेवटचा दिवस असून, प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा