Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ४ जानेवारी, २०२६

शिरपूरच्या शनी मंदिराला नवे नेतृत्व; भूपेशभाई पटेल अध्यक्षपदी विराजमान



शिरपूर  प्रतिनिधी- शिरपूर–वरवाडे नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष श्री. भूपेशभाई पटेल यांची श्री. शनी मंदिर, शिरपूर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिरपूर शहरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल श्री. शनी मंदिर ट्रस्टतर्फे विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी श्री. शनी मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष तथा भाजपा धुळे ग्रामीणचे मा. जिल्हाध्यक्ष श्री. बबनराव चौधरी यांच्या हस्ते श्री. भूपेशभाई पटेल यांचा शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. श्री. पटेल यांनी आतापर्यंत नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांची दखल घेत ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सत्कारप्रसंगी बोलताना श्री. बबनराव चौधरी यांनी, “श्री. शनी मंदिर हे श्रद्धेचे केंद्र असून या मंदिराच्या व्यवस्थापनात पारदर्शकता, शिस्त व विकासात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. श्री. भूपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ट्रस्टचे कार्य अधिक गतिमान होईल,” असा विश्वास व्यक्त केला. यावेळी श्री. शनी मंदिर ट्रस्टचे सचिव श्री. राजेंद्र पाटील, विश्वस्त श्री. नरेंद्र पाटील यांच्यासह ट्रस्टचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

नवनियुक्त अध्यक्ष श्री. भूपेशभाई पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानत, “श्री. शनी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी, भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि ट्रस्टच्या कार्यात पारदर्शकता राखण्यासाठी आपण सर्वांच्या सहकार्याने काम करू,” असे आश्वासन दिले. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध