Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ४ जानेवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
मालेगाव शहरात अवैधरित्या घातक अग्निशस्त्रे बाळगणारे सराईत गुन्हेगार जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व किल्ला पोलीसांची धडक कारवाई
मालेगाव शहरात अवैधरित्या घातक अग्निशस्त्रे बाळगणारे सराईत गुन्हेगार जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व किल्ला पोलीसांची धडक कारवाई
प्रतिनिधी- संदीप अवधूत
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आदेशीत केल्याप्रमाणे, जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी तत्वर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार आज दिनांक ०४/०१/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मालेगाव शहरातील किल्ला पोलीस ठाणे हद्दीत दोन संशयीत इसम अवैधरित्या घातक अग्नीशस्त्रे कब्जात बाळगुन दहशत पसरविण्याचे उद्देशाने फिरत असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व किल्ला पोलीस स्टेशनचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मालेगाव शहरातील ईस्लामाबाद परिसरातुन खालील संशयीत इसमांना ताब्यात घेतले.पैकी हिदायत शरिफ शेख, वय २७, रा.भारत सिनेमा हॉलजवळ, न्यु नाना पेठ, पुणे, जि. पुणे
व अब्दुल मलिक अकिल अहमद, वय १९, रा. ईस्लामाबाद, मालेगाव, ता. मालेगाव, जि.नाशिक ताब्यात घेतलेले वरील दोन्ही इसमांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०८ जीवंत काडतूसे मिळून आली. सदर दोन्ही इसम हे विनापरवाना बेकादेशीररित्या घातक अग्नीशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आले असून त्यांचेविरूध्द मालेगाव किल्ला पोलीस ठाणेस भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी क. १ हिदायत शेख हा पुणे जिल्हयातील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत असे गंभीर स्वरूपाचे एकुण ०६ गुन्हे दाखल आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, सहा. पोलीस अधीक्षक मालेगाव शहर विभाग सिध्दार्थ बारवाल, सहा. पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग श दर्शन दुगड यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, किल्ला पोलीस ठाण्याचे पोनि सुधीर पाटील, स्थागुशाचे पोउनि दत्ता कांभिरे, किल्ला पो. स्टे. चे पोउनि भुषण चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार सुभाष चोपडा, दत्ता माळी, योगेश कोळी, पंकज भोये, अंबादास डामसे, विजय तावडे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा