Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ७ जानेवारी, २०२६
तुळजापूर तालुक्यात धक्कादायक घटना: १३ वर्षीय मुलाचा निर्घृण खून; चुलत्यास अटक
तुळजापूर दि. ७ तालुक्यातील तामलवाडी साठवण तलाव परिसरात १३ वर्षीय अल्पवयीन कृष्णा सदानंद कांबळे याचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करून मृतदेह गवताखाली फेकून दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ओमकार देवीदास कांबळे यास तामलवाडी पोलिसांनी अटक केली असून, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही घटना दिनांक ०१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी घडली असून, ०५ जानेवारी रोजी मृतदेह आढळून आल्याने प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०४/२०२६ कलम १०३(१) भा.न्या.सं. अन्वये ०६ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गालगत तामलवाडी शिवारातील कदम यांच्या शेतात उमरगा तालुक्यातील कोळसूर येथील ओमकार कांबळे हा आपल्या भावजयी ज्योती कांबळे हिच्यासह सालगडी म्हणून काम करत होता. ज्योती कांबळे यांचा मुलगा कृष्णा हा कधी वडिलांकडे तर कधी आईकडे राहत होता. कृष्णा याला आपल्या आई व चुलत्यामधील अनैतिक संबंधाची माहिती होती व ही बाब तो वडिलांना सांगत असल्याने आरोपी ओमकार कांबळे याला त्याचा राग होता. कृष्णा हा त्यांच्या संबंधात अडसर ठरत असल्याच्या संशयातून आरोपीने दिनांक ०१ जानेवारी रोजी दुपारी साठवण तलावातील पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा पाईप बसवण्याच्या बहाण्याने कृष्णा यास तलावाजवळ नेले. तेथे कुऱ्हाडीने वार करून कृष्णा याचा निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर आरोपीने मृतदेह तलावालगतच्या गवताखाली लपवून ठेवून घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र मृत मुलाची ओळख पटताच व तपासात संशय बळावताच खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तामलवाडी पोलिसांनी आरोपी ओमकार कांबळे यास उमरगा तालुक्यातील कोळसूर गावातून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलाच्या निर्घृण हत्येने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही दिवसांत दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे. या क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा