Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

खतवड येथे रा.से.यो.विशेष श्रमसंस्कार शिबिरात युवकांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन; सातत्य, जिज्ञासा आणि सकारात्मक दृष्टिकोन मनाशी बाळगल्यास यश निश्चित-पो.नि.शेगर



संदीप अवधूत नाशिक प्रतिनिधी

महाविद्यालयीन जीवनात असतानाच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली पाहिजे.अभ्यासाच्या वाटेत येणाऱ्या अडचणींवर मात करत सातत्य, जिज्ञासा आणि सकारात्मक दृष्टिकोन मनाशी बाळगल्यास यश निश्चित मिळते. युवकांनी ध्येय स्पष्ट ठेवून कठोर परिश्रम करावेत, असे आवाहन दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी केले.
   
दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दिंडोरी यांच्या वतीने “शाश्वत विकासासाठी युवक; पाणलोट आणि जमीन व्यवस्थापन” या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात असून, या शिबिरानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पोलीस निरीक्षक शेगर बोलत होते.
    
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक खुळे यांनी सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की,सध्याच्या काळात वाढत असलेल्या ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे, आर्थिक घोटाळे याबाबत विद्यार्थ्यांनी कशी सतर्कता बाळगावी, याची सविस्तर माहिती देत अनोळखी लिंक, कॉल व संदेशां पासून सावध राहण्याचा सल्ला पो.नि.खुळे यांनी दिला.
     
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी सरपंच बबन दोबाडे , उपसरपंच सुकदेव खुर्दळ, प्रकाश खुर्दळ, कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रा.धनंजय लोंढे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीमती प्रा.प्रियंका कड, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या केले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, स्पर्धा परीक्षांबाबत जागरूकता आणि सायबर सुरक्षेबाबत सजगता निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध