Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ११ जानेवारी, २०२६

“नऋणानुबंध मैत्रीचे” — १९९२–९३ बॅचचा भावनिक पुनर्मिलन सोहळा



गणपूर | प्रतिनिधी गणपूर येथील विकास माध्यमिक विद्या मंदिर येथे माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे. “नऋणानुबंध मैत्रीचे” या भावनिक संकल्पनेतून इयत्ता दहावी सन १९९२–९३ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे.

या स्नेह मेळाव्यात शाळेतील सर्व गुरुजनांचा सन्मान करण्यात येणार असून, दीर्घ काळानंतर एकत्र येणाऱ्या माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि आठवणींचे वातावरण पाहायला मिळणार आहे. शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्याचा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमात मार्गदर्शनपर मनोगते, आठवणींचा मुक्त संवाद, सत्कार समारंभ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेह संमेलनासाठी सर्व गुरुजन व माजी विद्यार्थ्यांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक माजी विद्यार्थी – विकास माध्यमिक विद्या मंदिर, गणपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपूर्ण गावात या स्नेह मेळाव्याबाबत उत्सुकता असून, हा कार्यक्रम मैत्री, कृतज्ञता आणि शालेय संस्कारांचे दर्शन घडवणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध