Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १२ जानेवारी, २०२६
Home
/
/
श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने राष्ट्रमाता. राजमाता माॅ जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने राष्ट्रमाता. राजमाता माॅ जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
खामगाव जि बुलढाणा
महापुरुषांचे विचार कायम समाजाला प्रेरणा देतात - देविदास शर्मा
स्थानिक सतिफैल परीसरातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा आज दिं १२-१-२०२६ सोमवार रोजी सकाळी ११ वा मंडळाच्या संस्थापक एकनिष्ठ संचालिका सौ पार्वती बाई सुकाळे यांच्या घरी राष्ट्रमाता. राजमाता माॅ जिजाऊ यांच्या प्रतिमेला प्रतिमेला कुंकुम तिलक लावून.पुष्पहार अर्पण करून विधिवत पुजन करून माॅ जिजाऊ वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले
या वेळी स्त्रीशक्तीचा विचार केला की इतिहासातील काही तेजस्वी व्यक्तीमत्वे आजही दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला दिशा दाखवतात त्यातील सर्वात उजळ नांव म्हणजे राजमाता जिजाऊ माॅसाहेब
बुध्दी आणि युक्ती च्या जोरावर माॅ साहेब जिजाऊंनी अशक्य ते शक्य करून दाखविले स्वराज्य निर्माण केले. स्वामी विवेकानंदानी ध्येय पुर्ती होईपर्यंत थांबु नका असा संदेश दिला महापुरुषांचे विचार व कार्य समाजाला कायम प्रेरणा देत असतात असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांनी केले राजमाता माॅ जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली या वेळी ते बोलत होते . जिजाऊ वंदना घेऊन अल्पोपहार ,चहा वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
या प्रसंगी जेष्ठ साहेबराव सुकाळे,भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा,विनोद सुकाळे, दिलीप झापर्डे . अर्जुन जाधव.लालाजी सांगळे.आशाबाई अंधारे, पार्वतीबाई सुकाळे,संगिता वाघोळे . रजनी सुकाळे, आरती सुकाळे,मंजरी सुकाळे, भक्ती सुकाळे, धनश्री सुकाळे, भुमी सुकाळे,
आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिलीप झापर्डे यांनी केले अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही दिवसांत दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे. या क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा