Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १२ जानेवारी, २०२६

बेटावद येथे नायलॉन मांजाविरोधात जनजागृती; विद्यार्थ्यांनी घेतले सुरक्षिततेचे धडे



बेटावद प्रतिनिधी- बेटावद येथील फ. मु. ललवणी विद्यालय येथे नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. निलेश मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.महाराष्ट्र शासनाने 2016 पासून नायलॉन मांजा चीनिर्मिती, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे आणि नियमांचे उलघण करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईलअसे
मार्गदर्शन करतानासहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. निलेश मोरे यांनी नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच निष्पाप पक्षी गंभीर जखमी होण्याच्या व मृत्यूच्या घटनांची माहिती दिली. मकर संक्रांतीसारख्या सणांच्या काळात पतंग उडवताना नायलॉन अथवा काचलेप असलेला मांजा वापरल्याने अनेक अपघात घडतात. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर कायद्याने गुन्हा असून त्यावर कठोर कारवाई होऊ शकते, याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.


“पतंग उडवण्याचा आनंद घेताना स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता धोक्यात येणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी फक्त सुती (कॉटन) मांजाच वापरावा,” नायलॉन मांजा दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे (112)असे आवाहन श्री. निलेश मोरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापकश्री दीपक पवार सर होते. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन करून सुरक्षित सण साजरे करण्याचे आवाहन केले. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जनजागृती कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र महाले, पो. हे. कॉ. चंद्रकांत साळुंखे, योगेश गिते, पो. कॉ. विजय माळी, विनोद कोळी, प्रशांत पाटील आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा न वापरण्याची प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जबाबदारी आणि सामाजिक भान निर्माण होण्यास मदत झाली, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध