Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ जानेवारी, २०२६

शिरपूर शहरात प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा विक्री करणारे दोन दुकानदार रंगेहाथ पकडले



शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी संबंधित दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
राज्य शासनाने चायना व नायलॉन मांजावर बंदी घातलेली असून, हा मांजा मानव, पक्षी तसेच वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. तरीही काही दुकानदार नियमांचे उल्लंघन करून अशा प्रतिबंधित मांजाची विक्री करत असल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, शिरपूर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शहर परिसरात कोणी चायना अथवा नायलॉनचा प्रतिबंधित मांजा विक्री करत असल्याचे किंवा अशा मांजाचा वापर करून पतंग उडवित असल्याचे आढळल्यास तात्काळ शिरपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. नागरिकांच्या सहकार्यामुळेच अशा धोकादायक प्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध