Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ जानेवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
मालेगाव शहरात चोरीचे १४० मोबाईल हस्तगत, ०२ सराईत चोरटे अटकेत नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
मालेगाव शहरात चोरीचे १४० मोबाईल हस्तगत, ०२ सराईत चोरटे अटकेत नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
संदीप अवधूत नाशिक ग्रामीण प्रतिनिधी
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्हयातील नाउघड मालाविरुध्दचे गुन्हयांचा आढावा घेवून जिल्हा अभिलेखावरील गुन्हेगारांचे सध्याचे ठावठिकाणांबाबत माहिती घेण्यास पोलीस पथकांना सुचना दिलेल्या आहेत, त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांचे पथक जिल्हयातील नाउघड चोरी व घरफोडीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत होते.
दिनांक १३/०१/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार मालेगाव शहरात अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती घेत असतांना, मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे मनमाड चौफुली, मालेगाव परिसरात काही सराईत गुन्हेगार चोरीचे मोबाईल विक्रीसाठी घेवुन येणार असल्याची खात्रीशीर बातमी पथकास मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने खालील आरोपीतांना ताब्यात घेतले आहे. १) मुस्तफा रबुल अन्सारी, वय २४, रा. खैरटुंडा गाव, ता. रोशनटुंडा, जि. गिरडी, झारखंड, हल्ली दुधबाजार नाशिक
२) मोहंमद हनिफ मोहंमद युनुस, रा. म्हालदा शिवार, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक
३) मेहताब अन्सारी, रा. झारखंड राज्य (फरार)
यातील ताब्यात घेतलेले आरोपी क्रं. १ ते २ यांचे कब्जातुन चोरीचे रेडमी व व्हिवो कंपनीचे नवीन १४० मोबाईल फोन किं.रू. २७,३३,९६०/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर चोरीचे मोबाईल बाबत चौकशी केली असता, नाशिक ग्रामीण हद्दतील सटाणा पोलीस स्टेशन व नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यांमध्ये मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. सदर बाबत अधिक माहिती घेतली असता, नाशिक शहरातील किनारा हॉटेल, मुंबई नाका परिसरातील एका कुरियर कंपनीचे गाळयाचे शटर वाकवुन यातील आरोपीतांनी नवीन १६० मोबाईल फोन चोरी केले असलेबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपीतांनी कबुली दिलेवरून घरफोडी व चोरीचे एकुण ०२ गुन्हे उघडकीस आलेले आहे.
सदर आरोपीतांना सटाणा पोलीस स्टेशन कडील गुरनं ६२३/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) या गुन्हयाचे तपासकामी हजर करण्यात आले असून त्यांचेविरूध्द यापुर्वी नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचेकडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांनी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार वेतन संवत्सरकर, सुधाकर बागुल, सुभाष चोपडा, प्रशांत पाटील, दत्ता माळी, योगेश कोळी, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने वरील प्रमाणे कारवाई करून घरफोडी व चोरीचे ०२ गुन्हे उघडकीस आणलेले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही दिवसांत दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे. या क...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा