Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

पटेल महिला माहाविद्यालयाच्या रासेयो शिबीराचा समारोप



शिरपूर प्रतिनिधी : कबचौउमवि, जळगाव व एच. आर. पटेल कला व विज्ञान महिला महाविद्यालय, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राचार्या डॉ शारदा शितोळे यांच्या मार्गदर्शनाने आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खर्दे बु।। येथे आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचा समारोप झाला.

या निमित्त, रासेयो तालुका समन्वयक डॉ अतुल खोसे व खर्दे बु।। येथील आर सी पटेल विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. चव्हाण, पोलिस पाटील श्री सुरेश सोनवणे, तंटा मुक्ती अध्यक्ष श्री. काशिनाथ पटेल प्रमुख पाहूणे होते तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ गजानन पाटील हे अध्यक्ष होते.

या प्रसंगी, डॉ खोसे यांनी राष्ट्रीय सेवा योजना संकल्पनेचा उदय, कार्यप्रणाली, महत्व व हेतू सांगीतला. त्यांनी शिबीर कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन रासेयो स्वयंसेवक विद्यार्थिनींनी श्रमातून संस्कार मिळवल्याचे नमूद केले.

तसेच, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ गजानन पाटील यांनी रासेयो सात दिवसीय शिबीर यशस्वी संप्पन्न झाल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. त्यांनी शिबीर काळातील उत्कृष्ट दिनचर्या, विविध उपक्रम, व्याख्यानांचे आयोजन या बाबत आश्चर्य व्यक्त केले. महाविद्यालयाचे शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ राहुल सनेर यांनी रासेयो स्वयंसेवक विध्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी रासेयो ची महत्वाची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ आर एम वाडीले यांनी प्रास्ताविकात शिबीराचे अहवाल वाचन केले. त्यांनी शिबीराच्या उद्घाटनापासून समारोपापर्यंतच्या प्रभात फेरी, योगा, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान तपनभाई मुकेशभाई मेमोरियल हॉस्पिटल भेट, सिकरसेल आजारावर जनजागृती, सांस्कृतिक कार्यक्रम या सारख्या विविध उपक्रमाचा वृतांत मांडला. डॉ वाडीले यांनी शिबीराच्या सात दिवसा दरम्यान सौ प्रतिभा सिसोदे 'योग अभ्यास काळाची गरज' डॉ जयश्री निकम 'महिलांचे आरोग्य' प्रा यशवंत निकवाडे 'व्यक्तिमत्व विकास' कवी सुभाष अहिरे 'अहीराणी भाषा संवर्धन' समुपदेशक अपेक्षा पगार 'महिला सक्षमीकरण', वनपाल अस्मिता खैरनार 'वनसंवर्धन', प्रा सी जी पाटील 'स्वच्छ भारत व युवकांची भूमिका', डॉ एम व्ही पाटील 'लोकशाहीत संविधानाचे महत्व', डॉ सुनिल गोराणे 'जल संवर्धन', नैना राठोड़ 'आपका लक्ष क्या हो', डॉ भरत सोनार 'अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध व्याख्यात्यांची व्याख्याने झाल्याचे सांगीतले. त्यांनी खर्दे बु।। च्या सरपंच सौ. प्रमिला बन्सीलाल बागुल, माजी पं से सदस्य व विद्यमान सुतगिरणी संचालिका सौ. रंजना रविंद्र गुजर, माजी सरपंच श्री. रविंद्र हांडू गुजर माजी सरपंच सौ.सविता काशिनाथ पटेल, माजी सरपंच श्री.चंद्रकांत ब्रिजलाल गुजर माजी सरपंच श्री.भरत लोटन गुजर तंटा मुक्ती श्री. काशिनाथ ओंकार पटेल, माजी सैनिक श्री. संदिप कृष्णा पटेल, पोलिस पाटील श्री. सुरेश हिरामण सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते श्री. बन्सीलाल बाबुराव बागुल, ग्रामपंचायत अधिकारी श्री. नंदराज केशव बैसाणे आर. सी. पटेल मा. व उच्च. मा. विद्यालयाचे प्राचार्य श्री. पी. व्ही. पाटील, आर. सी. पटेल प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. क्रांती ना. जाधव आणि महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ विनय पवार, राहुल पगारे, अनिता धनगर तर आर सी पटेल विद्यालयाचे शिपाई राजू पवार यांच्या सारखे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांनी ज्यांनी शिबीराच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले त्यांचे ऋण व्यक्त केले.

तसेच, रासेयो स्वयंसेवक वर्षा कोळी, नंदिनी ईशी, राणी कोळी, विशाखा पाटील यांनी स्वागत गीत तर माधुरी पाटील हीने देशभक्तीपर गीत गायन केले. प्रियंका कोळी, मोहिनी माळी, स्वाती ईश्वर माळी, मोनिका रणदीवे, पुजा पाटील, मंजू पावरा, रेणुका कोळी, रुपाली चौधरी यांनी आपले अनुभव कथन केले. कल्याणी रघुवंशीने सुत्र संचालन केले तर हर्षदा पाटील हीने उपस्थितांचे आभार मानले. 

या प्रसंगी, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ मनिषा चौधरी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. भास्कर खैरनार, रासेयो स्वयंसेवक विद्यार्थिनी व खर्दे बु।। येथील ग्रामस्थ, आर सी पटेल विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध