Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

श्रीमती एच. आर. पटेल कला महिला महाविद्यालयात “ भूगोल दिवस साजरा” या निमित्त


                                   
शिरपूर प्रतिनिधी -प्रश्न मंजुषा व व्याख्यानाचे आयोजन श्रीमती एच. आर.पटेल महिला महाविद्यालयात भूगोल दिवस साजरा करण्यात आला 14 जानेवारी या भूगोल दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा शितोळे होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा.सतीष आडगाळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले होते. भूगोल दिवस तथा सप्ताह का साजरा केला जातो याचा हेतू काय? याबाबत प्रास्ताविकेतून भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.एम.वाडीले यांनी सविस्तर माहिती दिली.
            
प्रा.सतीष आड्गाळे यांनी भूगोल दिनाचे महत्त्व विशद करताना संक्रमण म्हणजे बदल हा कोणता होतो. तर ऋतूचक्रातला बदल कारण उत्तर गोलार्धात हिवाळा ऋतू असतो व 14 जानेवारी नंतर सूर्य हळूहळू उत्तर गोलार्धाकडे येऊ लागतो. तेव्हा उन्हाळ्याची चाहूल लागते रब्बी हंगाम शेतातील शेतकऱ्यांना आनंददायी उत्पादन देणारा ठरतो. त्यामुळेच उत्तर गोलार्धातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदोत्सव असतो. समाजात देखील नवचैतन्य निर्माण होते. उदा. महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणतात. तर खानदेशात उतरान असे म्हणतात, पंजाब राज्यात लोहरी, तर आसाम राज्यात बिहू, दक्षिण भारतात पोंगल व गुजरात राज्यात पतंग उत्सव एकंदरीतच उत्तरेकडील समाज व्यवस्थेमध्ये अत्यंत आनंददायी वातावरण निर्माण करणारे हे संक्रमण किंवा बदल म्हणजे मकर संक्रांत होय. त्याचबरोबर शेती पिकाला उत्पादनदृष्ट्या महत्त्व प्राप्त होते व शेतकऱ्यांच्या हाती आर्थिक संपन्नता येते. म्हणूनच मकर संक्रांतीला महत्व आहे. त्याच बरोबर भूगोल विषयाच्या विद्यार्थाना अलीकडे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.उदा.रिमोट सेन्सिंग, शहर नियोजन,पर्यावरण,सर्वेक्षण विभाग, नकाशा शास्र,भूगर्भ शास्र,पर्यटन,वाहतूक व दळणवळण इत्यादी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत. प्राचार्य डॉ. शारदा शितोळे यांनी मार्गदर्शन करताना भूगोल या विषयाला जागतिक तथा स्थानिक प्राधान्य प्राप्त झालेले आहे. कारण सी.डी. देशपांडे हे अभ्यासक, लेखक व मार्गदर्शक होते. त्यांनी विविध देशांमध्ये आपल्या भूगोल विषयाच्या ज्ञानाचा प्रसार केलेला असल्यामुळे भूगोल विषय हा लोकल पासून ग्लोबल पर्यंत असल्या कारणामुळे विद्यार्थिनींनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले तर आपले भविष्य अत्यंत उज्वल राहील अशा शुभेच्छा या निमित्ताने दिल्या.. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.दिव्या मोरे व आभार प्रदर्शन कु.कल्याणी पाटील यांनी केले. भूगोल दिवस साजरा करण्याचा दिनांक 15 जानेवारी रोजी भूगोल दिनानिमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण 76 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवलेला होता. या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भूगोल विभागचे प्रा.केशव तडवी, विद्यार्थिनी बसंती पावरा,संध्या पावरा, जाधव मीनाक्षी, थोरात प्रणाली, दिव्या मोरे, सारिका पावरा, चंदना पावरा,पाडवी तेजस्विनी,पावरा मंगला,पाटील भाग्यश्री,पाटील प्रिया,गिरासे सोनाली त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी जगदीश चौधरी, दक्षा शर्मा, तृप्ती जोशी, अनिता धनगर, राहुल पगारे, नाना भाऊ सोनवणे अजय गोयल, यांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध