Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १७ जानेवारी, २०२६
प्लास्टिक बंदी फक्त कागदावर! शिरपूरमध्ये सर्रास वापर, वरवाडे नगरपरिषद झोपेत
शिरपूर प्रतिनिधी - राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर कडक बंदी घालून अनेक वर्षे उलटली असतानाही शिरपूर शहरात मात्र ही बंदी केवळ कागदावरच उरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरातील बाजारपेठा, भाजी मंडई, किराणा दुकाने व रस्त्यालगतचे हातगाडे याठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर सुरू असून, याकडे वरवाडे नगरपरिषद मुद्दाम डोळेझाक करत असल्याचा संतापजनक आरोप नागरिक करत आहेत.प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाचा पूर्णपणे अपयश आले असून, कोणतीही ठोस कारवाई, दंडात्मक पावले किंवा तपासणी मोहीम दिसून येत नाही. परिणामी व्यापाऱ्यांना मोकळे रान मिळाले असून नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना प्रशासनाची ही बेफिकीर भूमिका अत्यंत गंभीर असून, नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याचे चित्र आहे.
आता तरी शिरपूर शहरात प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी होणार की नेहमीप्रमाणे हे प्रकरण दुर्लक्षित केले जाणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. अन्यथा नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही देण्यात येत आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
धुळे प्रतिनिधी - स्व.सुताम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट, धुळे संचलित श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा