Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ जानेवारी, २०२६

निवडणूक कर्तव्यात चूक; पोलिस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची तलवार



               धुळे | प्रतिनिधी

धुळ्यातील मिरच्या मारुती मराठा पंचमंडळ विद्यामंदिरातील मतदान केंद्रावर गुरुवारी (दि.१५) दुपारी मतदान सुरू असतानाच ईव्हीएम मशीनची तोडफोड झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मतदान केंद्र परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेवेळी कर्तव्यावर असताना परिस्थिती जबाबदारीने न हाताळल्याचा तसेच जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात बळाचा वापर न केल्याचा ठपका ठेवत धुळे शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते यांचे निलंबन करण्यात आले होते.

मात्र, सद्यस्थितीत त्यांच्या निलंबनाच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली असून, त्याऐवजी दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याबाबत ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येत आहे. निलंबनाची कारवाई ही शिक्षेच्या तुलनेत अत्यंत कठोर ठरली असती, असा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
या निर्णयामुळे पोलीस दलात तसेच प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध