Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १७ जानेवारी, २०२६

नागरिकांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा डाव फसला; संशयित पळून गेला, पिकअप वाहन ताब्यात



शिरपूर प्रतिनिधी -शिरपूर शहरात नागरिकांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात यश आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास काही संशयितांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. नागरिकांचा पाठलाग आणि गोंधळ वाढताच संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला.पाठलाग दरम्यान संशयित जवळच्या शेतात फरार झाले. मात्र घटनास्थळी वापरण्यात आलेली पिकअप वाहन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. वाहनाची तपासणी सुरू असून त्यावरून संशयितांचा माग काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून फरार संशयितांचा शोध सुरू आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी नागरिकांचे कौतुक केले आहे. या प्रकरणी पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध