Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

शिरपूर–वरवाडे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापतीपदी गणेशभाऊ सावळे यांची सर्वानुमते निवड



शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्याच्या विकासात्मक कार्याचे तेजस्वी नेतृत्व करणारे सन्माननीय भाईसाहेब अमरीशजी पटेल व सन्माननीय भूपेशभाई पटेल, तसेच नगराध्यक्ष आदरणीय चिंतनभाई पटेल यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कार्यरत नवनिर्वाचित नगरसेवक गणेशभाऊ सावळे यांची शिरपूर–वरवाडे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापतीपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून उत्कृष्ट, शाश्वत व नियोजनबद्ध पाणी व्यवस्थापनासाठी शिरपूर शहर संपूर्ण देशात आदर्श मानले जाते. अशा जबाबदारीच्या व संवेदनशील पदावर गणेशभाऊ सावळे यांची निवड झाल्याने शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत अधिक पारदर्शकता, नियोजन व दीर्घकालीन उपाययोजना राबवल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पाणीपुरवठा सभापती या पदाच्या माध्यमातून ते शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीने व प्रभावी कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत असून त्यांच्या पुढील सामाजिक व प्रशासकीय वाटचालीस सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध