Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० जानेवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
करवंद गावाजवळील सनस्टार कंपनीचा दुर्गंधीचा कहर; नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
करवंद गावाजवळील सनस्टार कंपनीचा दुर्गंधीचा कहर; नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील करवंद गावालगत असलेल्या सनस्टार कंपनीतून सातत्याने येणाऱ्या तीव्र व दुर्गंधीयुक्त वासामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. श्वसनाचे त्रास, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, डोळ्यांची जळजळ यांसारख्या तक्रारी वाढत असून लहान मुले, वृद्ध व आजारी व्यक्ती सर्वाधिक त्रस्त आहेत. रात्रीच्या वेळी दुर्गंधी अधिक तीव्र होत असल्याने घराबाहेर पडणे तर दूरच, घरात बसणेही मुश्किल झाले आहे. नागरिकांनी अनेकदा तोंडी व लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे. प्रदूषण नियंत्रण नियम धाब्यावर बसवून कंपनीकडून सर्रासपणे घातक वायू वातावरणात सोडले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
प्रशासनाची चुप्पी संशयास्पद
इतक्या गंभीर प्रकाराकडे स्थानिक प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ व आरोग्य विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. तपास, मोजमाप, नोटीस किंवा कारवाई काहीच न झाल्याने ‘कंपनीला कोणाचा वरदहस्त आहे का?’ असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
आंदोलनाचा इशारा जर तात्काळ कारवाई करून दुर्गंधी थांबवली नाही, कंपनीवर कठोर दंड व बंदची कारवाई केली नाही, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.
आता प्रशासन जागे होणार की नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा