Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ जानेवारी, २०२६
खर्च सादरीकरणात दिरंगाई नको; महिनाअखेरपूर्वी अहवाल देण्याचे आदेश
शिरपूर प्रतिनिधी - निवडणूक आचारसंहितेनुसार उमेदवारांनी सादर करावयाचा निवडणूक खर्चाचा तपशील सादर करण्यासाठी दिलेली मुदत आता अंतिम टप्प्यात आली असून महिना संपण्याच्या मार्गावर आहे. तरीही अनेक उमेदवारांनी अद्याप आपला निवडणूक खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी तात्काळ खर्चाचा संपूर्ण तपशील सादर करावा, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक उमेदवारास प्रचार, जाहिरात, सभा, वाहन वापर, बॅनर, पोस्टर, सोशल मीडियावरील प्रचार यासह केलेल्या सर्व खर्चाचा तपशील ठराविक कालावधीत निवडणूक खर्च निरीक्षकांकडे सादर करणे बंधनकारक आहे. खर्च सादर न केल्यास अथवा चुकीचा अहवाल दिल्यास उमेदवार अपात्र ठरू शकतो, तसेच दंड व कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी खर्च सादरीकरण अत्यंत महत्त्वाचे असून, कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित सर्व उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्चाचा अहवाल सादर करून संभाव्य कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा