Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २२ जानेवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
गंगापुर धरण परिसरात आयोजित सुर्यकिरण एअर शो निमीत्ताने सर्व प्रकारची वाहने पर्यायी मार्गाने वळविणे बाबत पोलीस अधीक्षकांचे आदेश
गंगापुर धरण परिसरात आयोजित सुर्यकिरण एअर शो निमीत्ताने सर्व प्रकारची वाहने पर्यायी मार्गाने वळविणे बाबत पोलीस अधीक्षकांचे आदेश
संदीप अवधूत - नाशिक जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
दिनांक २२/०१/२०२६ व २३/०१/२०२६ रोजी नाशिक तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गंगापूर धरण येथे सुर्यकिरण एअर शो आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक ते गिरणारे जाणारे येणारे सर्व प्रकारची खाजगी वाहने अन्य मार्गाने वळविण्यात येत आहे गंगापूर धरण येथे सुर्यकिरण एअर शो अनुषंगाने वाहतुक सुरळीत रहावी व वाहतुक कोंडी होवू नये या करिता खबरदारी म्हणून सर्व प्रकारची खाजगी वाहने (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसेस, रुग्णवाहिका, शासकिय वाहन वगळून) हे अन्य मार्गाने वळविण्यात येत आहे त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील, व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार वाहतुक मार्गात खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.
वाहतुक नियोजन व रस्ता वळण सुचना दिनांक २२/०१/२०२६ रोजी चे सकाळी ०६:०० ते दुपारी ०३:०० वा. पावेतो व दिनांक २३/०१/२०२६ रोजी चे सकाळी ०६:०० ते दुपारी ०३:०० वा. पावेतो नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्यीत गंगापुर धरण परिसरात नाशिक ते गिरणारे येणा-या जाणा-या सर्वसाधारण वाहतुकीत बदल करण्यात येत आहे तसेच सुर्यकिरण एअर शो चे तिकिट (पासधारक) धारकांसाठी गोवर्धन ते दुगावरोड चालू राहिल नाशिक - गिरणारे या वाहतूक मार्गामध्ये करण्यात आलेला बदल पुर्वीचा वाहतुकीचा मार्ग नाशिक- गोवर्धन गंमतजंमत दुगांव रोड-दुगांव - गिरणारे गिरणारे दुगांव दुगांव रोड गंमतजंमत गोवर्धन - नाशिक, तात्पुरता पर्यायी मार्ग नाशिक आनंदवली चांदशी मुंगसारे फाटा-दुगांव - गिरणारे व गिरणारे दुगांव मुंगसरे मातोरी मखमलाबाद - राऊहॉटेल - पेठ रोड तात्पुरते पर्यायी वाहतुक मार्गामध्ये केलेल्या बदला बाबत पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण कार्यालयाकडून स्वतंत्र अधिसुचना जारी करण्यात आली आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावीअसे आव्हान करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा