Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६
एकाच रात्री सात बंद घरे फोडली !
अमळनेर, (वा.) तालुक्यातील वावडे येथे सात बंद घरे फोडत अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने असा एकूण १ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २० रोजी रात्री ते २१ रोजी सकाळ दरम्यान घडली.
वावडे येथील काही लोक बाहेरगावी गेलेले असताना काही अमळनेरमध्ये राहायला असलेल्या बंद घरांची माहिती घेत चोरट्यांनी शिताफीने कुलूप उघडून दिनेश मच्छीन्द्र पाटील यांच्या घरातून २० हजार रुपये व सात
भार चांदी, राजेंद्र पुंडलिक पाटील यांच्या घरातून २५ हजार रुपये रोख, प्रदीप तोरण पाटील यांच्या घरातील १७ हजार रुपये रोख आणि ५ ग्राम सोन्याची पोत, बारकू पितांबर पाटील यांच्या घरातून २५ हजार रोख व ३० ग्राम सोन्याची पोत, तसेच रतीलाल अमृत
पाटील यांच्या घरातून सोन्याचे टोंगल, अंगठी आणि चांदी असे साहित्य चोरून नेले. तसेच अरुण ढोमण पाटील यांचेही घर फोडले.
चोरट्यानी घरातील कपाट तोडून कपडे व इतर साहित्य उलगडून अस्ताव्यस्त फेकलेले होते. डीवायएसपी विनायक कोते, एपीआय जीभाऊ पाटील, सुनील पाटील, दिनेश पाटील, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे यांनी भेट देऊन पाहणी केली. जळगाव येथून श्वान पथक, ठसे तज्ञ, फॉरेन्सिक पथक यांनीही घटनस्थळावरून नमुने गोळा केले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा