Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

प्लॅस्टिक ड्रमच्या आडोशाला लवपुन अवैधरित्या मद्याची होणारी तस्करी रोखण्यात नाशिक ग्रामीण पोलीसांना यश; मुंबई आग्रा महामार्गावर २० लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त..!



माधव खाबिया दिंडोरी प्रतिनिधी

नाशिक जिल्हयातील राज्य व राष्ट्रीय महामांवरून अवैधरित्या मद्याची होणारी तस्करी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक ते धुळे बाजुकडे एका ट्रक मधून मोठया प्रमाणात अवैधरित्या मद्याची तस्करी होत असल्याची बातमी मिळाली होती. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत कोकणगाव फाटा उड्‌डाणपुलाजवळ वाहन तपासणी सापळा रचुन खालील वर्णनाचा व किंमतीचा अवैध मद्यसाठा आरोपीच्या ताब्यातुन एका आयशर ट्रकसह जप्त केला आहे.

पोलीस ठाणे / गुरनं पिंपळगाव पो.स्टे. गुरनं ०९/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई), सह भा. व्या.सं. कलम ३(५) कारवाई करण्यात आली
मुंबई आग्रा महामार्ग, कोकणगाव फाटा उड्‌डाणपुलाचे बोगद्याजवळ, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक या ठीकणी कारवाई झाली त्यामध्ये जप्त मद्यसाठा जमा करण्यात आला
केंद्रशासित प्रदेश दिव-दमन येथील विदेशी मद्याचे २०० बॉक्स किं.रू. २०,२५,२४०/- जप्त करणातआले असुन जप्त वाहन व साहित्यमध्ये
आयशर कंपनीचा ट्रक MH-04-FD-6655 किं. रू. ६,००,०००/-, एक मोबाईल फोन १०,०००/- रू., ३१ प्लॅस्टिकचे इम किं. रू. ३१,०००/-

एकुण मुद्देमाल २६,६६,२४०/- रूपये असुन आरोपींची  नावे
ललीत हरिराम सोनी, वय ४०, रा. राहीवाली वास, सिवाना, ता. सिवाना, जि. बाडमेर, राज्य राजस्थान असुन
यातील आरोपी ललीत हरिराम सोनी, रा. राजस्थान राज्य हा त्याचे कब्जातील वाहनामध्ये केंद्रशासित प्रदेश दिव दमन येथील मद्यसाठा घेवुन, गाडीचे मागील बाजुस प्लॅस्टिकचे रिकामे डूम आडोशाला ठेवुन वरील वर्णनाचा अवैध मद्यसाठा स्वतःचे कब्जात बाळगुन विकी करण्याचे उद्देशाने वाहतुक करतांना मिळून आला असुन त्यास वरील गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणी पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक  बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार दिपक गुंजाळ, विश्वनाथ थारबळे, सुभाष चोपडा, केतन कापसे, योगेश कोळी, संदिप राठोड, श्रीराम वारूंगसे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध