Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ जानेवारी, २०२६

शाळेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश; मुख्याध्यापिकेविरुद्ध लाच प्रकरणी गुन्हा दाखल



धुळे प्रतिनिधी - स्व.सुताम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट, धुळे संचलित श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका श्रीमती भारती गिरीष जोशी यांनी ताक्राराकडून २५०० रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारल्याप्रकरणी एका तक्रारदार महिलेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार श्रीमती शांताबाई पिंगळे या विद्यालयात ग्रंथपाल पदावर कार्यरत होत्या. त्यांचा सेवाकाल २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कालबद्ध पदोन्नतीतील फरकाचे बिल तसेच ग्रंथपाल पदावरून उच्च पदावर उन्नयन झाल्यानंतरच्या पगारातील फरकाची रक्कम अद्याप मिळालेली नव्हती. ही रक्कम अदा करून देण्यासाठी मुख्याध्यापिका भारती जोशी यांनी तक्रारदाराकडे २,५०० रुपयांची लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी तक्रारदार महिलेने दि. १३ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. सापळ्यादरम्यान मुख्याध्यापिका भारती जोशी यांनी तक्रारदाराकडून २,३४० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध