Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १६ जानेवारी, २०२६
धक्कादायक घटना 65 वर्षीय माताऱ्याने केला आदिवासी मुलीचा विनयभंग
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे
आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील बखळ जागेत घडली.
एक आदिवासी समाजाची पाचवीत शिकणारी ११ वर्षाची मुलगी भरवस येथील शाळेत जाण्यासाठी एकलहरे गावाच्या बसस्थानकावर उभी असताना हनुमंत यादव पाटील वय ६५ याने हातात पैसे दाखवून मुलीला खळ्यात बोलावले, तिचा हात धरून मुलीला ओढण्याचा प्रयत्न केला असता मुलगी हात झटकून पळून गेली. मुलीने मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भारतीय न्याय संहिता कलम ७४, पोक्सो कायदा कलम ८,१२, अनुसूचित जाती जमाती अधिनियम ३ (१) (डब्ल्यू), (१), (२), ३(२) (व्ही अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा