Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ४ जानेवारी, २०२६
Home
/
/
क्रांति ज्योती सावित्रीआई फुले जयंतीनिमित्त शिरपूर येथे समाजप्रबोधनाचा जागर — डॉ. नागेश गवळी यांचे प्रभावी व्याख्यान
क्रांति ज्योती सावित्रीआई फुले जयंतीनिमित्त शिरपूर येथे समाजप्रबोधनाचा जागर — डॉ. नागेश गवळी यांचे प्रभावी व्याख्यान
शिरपुर प्रतिनिधी—क्रांति ज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त दि. ०३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता क्रांति ज्योती सावित्रीआई फुले नगर, वरवाडे, शिरपूर येथे जयंती उत्सव व प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रम क्रांति ज्योती सावित्रीआई फुले सांस्कृतिक मित्र मंडळ व वरवाडे ग्रामस्थ, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते डॉ. नागेश गवळी (अहिल्यानगर) यांचे प्रबोधनपर व्याख्यान झाले. हे व्याख्यान केवळ भाषण न राहता समाजाला आरसा दाखवणारे, वास्तवाची जाणीव करून देणारे व विचार प्रवृत्त करणारे ठरले. सावित्रीआई फुले यांच्या कार्याचा, त्यागाचा व स्त्री शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचा प्रभावी आढावा त्यांनी आपल्या व्याख्यानातून मांडला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.अमरीशभाई पटेल (माजी शालेय शिक्षण मंत्री, महा. मुंबई), मा.भूपेशभाई पटेल (मा. नगराध्यक्ष, शि. न. प.), मा. काशीरामदादा पावरा (आमदार, शिरपूर तालुका), मा. महेंद्र माळीसाहेब (तहसीलदार, शिरपूर) तसेच मा. किशोर कुमार परदेशी (पोलीस निरीक्षक, शिरपूर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मान्यवर म्हणून काशिनाथ माळी (माजी उपनगराध्यक्ष, शि. व.न. प.),वासुदेव देवरे (माजी उपनगराध्यक्ष),मोतीलाल माळी (माजी उपनगराध्यक्ष ),सौ. वर्षा रविंद्र माळी (नगरसेविका) सौ.आशा भालेराव माळी (नगरसेविका),मिराबाई नामदेव कोळी (नगरसेविका),दिपक माळी (नगरसेवक), मा.गणेश साळवे (नगरसेवक),बाबुलाल माळी (नगरसेवक), संतोष माळी( माजी नगसेवक),दिलीप बोरसे (माजी नगरसेवक),श्रीराम माळी वाघाडी, किशोर माळी (माजी शिक्षण मंडळ सदस्य)भटु माळी (माजी सरपंच मांडळ),हिंमत माळी,पिंटु माळी (समता परिषद अध्यक्ष), भालेराव माळी(विश्वस्थ बालाजी मंदिर ट्रस्ट)
कार्यक्रमासाठी संत सावता माळी समाज ट्रस्ट, वरवाडे, महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच, संत सावता माळी भजनी मंडळ, संत सावता माळी हरिपाठ महिला मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, सरकार ग्रुप मित्र मंडळ, एस. एफ. बॉईज मित्र मंडळ, एम. जे. ग्रुप मित्र मंडळ, ए. जे. ग्रुप मित्र मंडळ, मरीमाता मित्र मंडळ,तसेच समस्त वरवाडे ग्रामस्थ व मित्र मंडळी यांचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमात सावित्रीच्या लेकी करुणा संदीप माळी व नेहा रवींद्र माळी यांनी स्त्री अत्याचार बाबत जनजागृती पर भाषण दिली.
समाजातील ज्येष्ठ, श्रेष्ठ व पदाधिकारी यांच्या देणगीतून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या कार्याला अभिवादन केले.
क्रांतीज्योती सावित्रीआई फुले सांस्कृतिक मित्र मंडळ व वरवाडे ग्रामस्थ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बैसाने सर व बापू माळी सर यांनी केले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही दिवसांत दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे. या क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा